VIDEO : डोनाल्ड ट्रम्प यांना आवडली 'तिची' फिगर, पाहा काय म्हणालेत!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एका वाह्यातपणा केलाय. तोही पत्नी मेलॅनियांनाच्या समोर. महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सतत वादात सापडणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. 

VIDEO : डोनाल्ड ट्रम्प यांना आवडली 'तिची' फिगर, पाहा काय म्हणालेत!

पॅरिस : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एका वाह्यातपणा केलाय. तोही पत्नी मेलॅनियांनाच्या समोर. महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सतत वादात सापडणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प अलिकेड फान्सच्या दौऱ्यावर होते. तिथे फ्रान्सची फर्स्ट लेडी अर्थात राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रोन यांच्या पत्नी ब्रिगीटी मॅक्रोन यांना उद्देशून ट्रम्प यांनी टिप्पणी केली. यू आर इन सच अ गुड शेप, अशे आक्षेपार्ह वक्तव्य करत फिगरबाबत कमेंट केली. एवढंच नाही तर एमॅन्युएल मॅक्रोन यांच्याशी बोलतानाही तुमची पत्नी अजून चांगल्या शेपमध्ये आहे, याचा पुनरुच्चारही केला आणि हातमिळवताना म्हटले ब्युटीफुल असे उद्गार ट्रम्प यांनी काढले.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रोन हे ४० वर्षांचे आहेत. तर त्यांची पत्नी ब्रिगीटी ही ६४ वर्षांची आहे. तर डोनल्ड ट्रम्प हे ७१ वर्षांचे आहेत तर त्यांची पत्नी मेलॅनिया ४७ वर्षांची आहे. 

दरम्यान, त्याआधी पोलंडच्या फर्स्ट लेडीने मात्र ट्रम्प यांचा शेखहँड नाकारला. ट्रम्प यांच्या पोलंड दौऱ्यात नुकताच हा प्रकार घडला. एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी पोलंडच्या पंतप्रधानांना शेखहँड केला आणि त्यांच्या बाजूलाच उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी आगाथा यांना शेखहँड करण्यासाठी ट्रम्प यांनी हात पुढे केला. पण अगाथा यांनी सरळ तो नाकारला आणि पुढे होऊन मेलॅनियांना शेकहँड केला.