डोनाल्ड ट्रम्प करणार बेईमान आणि भ्रष्ट मीडियाच्या नावांंची घोषणा

मीडिया विरुद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा संघर्ष कायमच सुरू असतो. आता डोनाल्ड ट्रम्पच्या नव्या ट्विटमुळे पुन्हा हा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. 

Updated: Jan 3, 2018, 12:26 PM IST
डोनाल्ड ट्रम्प करणार बेईमान आणि भ्रष्ट मीडियाच्या नावांंची घोषणा

अमेरिका : मीडिया विरुद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा संघर्ष कायमच सुरू असतो. आता डोनाल्ड ट्रम्पच्या नव्या ट्विटमुळे पुन्हा हा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. 

डोनाल्ड ट्रम्पचं ट्विट 

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पाच  वाजता बेईमान आणि भ्रष्ट मीडियाचा पुरस्कार जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मीडिया आणि ट्रम्प यांच्यामधील संबंध सुरूवातीपासूनच कटू होते. 

खोटारड्या मीडिया हाऊस सतत वेगवेगळ्या श्रेणींमध्ये खराब दर्जाचे रिपोर्टिंग करतात. त्यांची नावं लवकरच जाहीर केली जातील. तोपर्यंत वाट बघा अशा आशयाचे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.  

 

मीडियाशी कटू संबंध 

सीएनएन, एबीसी न्यूज, द न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट अशा अनेक आघाडीच्या वृत्तपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल्ससोबत ट्रॅम्प यांचा सतत संघर्ष सुरू असतो. ट्रम्प या  मीडिया हाऊसेसना 'फर्जी' मीडिया म्हणते.