भयंकर : शाळेत लागलेल्या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू

मलेशियाची राजधानी कुलालंपूरच्या एका धार्मिक शाळेत लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झालाय. 

Updated: Sep 14, 2017, 09:31 AM IST
भयंकर : शाळेत लागलेल्या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू

कुआलालंपूर : मलेशियाची राजधानी कुलालंपूरच्या एका धार्मिक शाळेत लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झालाय. 

मृतांमध्ये २३ शाळकरी मुलांचा आणि शाळेतील दोन वार्डनचा समावेश आहे. तहफीज दारुल कुरान इत्तिफाकिया नावाचं ही धार्मिक शाळा राजधानीच्या मध्यभागी आहे. गेल्या २० वर्षांतील मलेशियातील ही आग सर्वात भयंकर घटना मानली जातेय.

शाळा परिसरात धुरामुळे श्वास कोंडल्यानं अधिक मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय.

गुरुवारी सकाळी ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याबद्दल अद्याप माहिती हाती आलेली नाही.