जपानमध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे ट्रेनसेवा ठप्प, ट्रेनमध्ये रात्रभर अडकले ४३० प्रवासी

जापानमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने हिमवृष्टी होत असल्याचं पहायला मिळत आहे. सतत होणाऱ्या हिमवृष्टीमुळे बसेस, ट्रेन्स आणि इतरही वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 12, 2018, 03:49 PM IST
जपानमध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे ट्रेनसेवा ठप्प, ट्रेनमध्ये रात्रभर अडकले ४३० प्रवासी

टोकीयो : जापानमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने हिमवृष्टी होत असल्याचं पहायला मिळत आहे. सतत होणाऱ्या हिमवृष्टीमुळे बसेस, ट्रेन्स आणि इतरही वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

हिमवृष्टीमुळे जवळपास ४३० प्रवासी रात्रभर ट्रेनमध्येच अडकल्याचा प्रकारही समोर आला आहे. जपानमधील समुद्र तटावर अधिकतर भागावर बर्फाची चादर पसरली आहे. 

जेआर ईस्ट रेल्वे कंपनीच्या निगाता शाखेचे प्रवक्ता शिनिची सेकी यांनी सांगितले की, चार डब्ब्यांची ट्रेन गुरुवारी एक तासापेक्षा अधिक उशिराने रवाना झाली.

ट्रेनच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाल्याने ट्रेन सुरुच चालूच शकत नव्हती. त्यामुळे ट्रेन क्रॉसिंगवरच थांबली. मध्येच ट्रेन थांबल्यामुळे प्रवाशांना ट्रेनमधून उतरताही येत नव्हतं आणि त्यामुळे प्रवाशांना बंद ट्रेनमध्येच रात्र काढावी लागली. 

प्रवाशांना १५ तास झालेल्या त्रासामुळे आणि या घडलेल्या प्रकाराबाबत सेकी यांनी प्रवाशांची माफीही मागितली आहे. त्यांनी सांगितलं की, ट्रेन क्रॉसिंगवर थांबली नसती तर आम्ही प्रवाशांसाठी जेवण्याची आणि इतरही व्यवस्था नक्की करु शकलो असतो.

जापानमध्ये प्रत्येकवर्षी या महिन्यात हिमवृष्टी होत असते. या हिमवृष्टीमुळे जनजीवन ठप्प होतं आणि नागरिकांची तारांबळ उडते. २०१६ या वर्षात राजधानी टोकीयोमध्ये आणि इतर परिसरात हिमवृष्टीमुळे १२ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी झालेल्या हिमवृष्टीने तब्बल ४५ वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. 

या आठवड्यात झालेल्या हिमवृष्टीमुळे जापानमधील अनेक परिसरातील जनजीवनावर परिणाम झाला होता. लाखो नागरिकांना आपल्या घरातून बाहेर पडणं कठीण झालं होतं.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close