दुसऱ्या महायुद्धातला जिवंत बॉम्ब सापडला, ७० हजार नागरिक सोडणार शहर

जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान न फुटलेला आणि अजूनही जिवंत स्वरुपात असलेला एक बॉम्ब सापडलाय. यामुळे शहरात खळबळ उडालीय. 

Updated: Aug 31, 2017, 11:14 PM IST
दुसऱ्या महायुद्धातला जिवंत बॉम्ब सापडला, ७० हजार नागरिक सोडणार शहर title=

बर्लिन : जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान न फुटलेला आणि अजूनही जिवंत स्वरुपात असलेला एक बॉम्ब सापडलाय. यामुळे शहरात खळबळ उडालीय. 

हा बॉम्ब निष्क्रीय करण्यासाठी संपूर्ण शहर रिकामं करावं लागणार आहे. त्यासाठी शहरातील जवळपास ७० हजार लोकांना इथून सुरक्षित बाहेर काढण्याचं काम प्रशासनाला करावं लागणार आहे. यानंतरच बॉम्ब निष्क्रीय केला जाईल.

न्यूज एजन्सी सिन्हुआनं दिलेल्या माहितीनुसार, फ्रँकफर्ट अग्निशमन विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब शहरात निर्माण कार्यादरम्यान मंगळवारी सापडला. यामध्ये १.४ टन विस्फोटक पदार्थ आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी शहर रिकामं केल्यानंतर हा बॉम्ब निष्क्रीय करण्याची प्रक्रिया सुरू होईल. सध्या कोणताही धोका या बॉम्बमुळे नाही. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून जिथं हा बॉम्ब सापडला त्याच्या जवळपासच १.५ किलोमीटर परिसर रिकामा करणं आवश्यक आहे.