अकी आबे - जपानच्या फर्स्ट लेडीबाबतच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी!

'मुंबई -अहमदाबाद' या बहुप्रतिक्षित बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे सध्या भारत दौर्‍यावर आले आहेत.

Updated: Sep 14, 2017, 03:35 PM IST
अकी आबे - जपानच्या फर्स्ट लेडीबाबतच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी!

मुंबई : 'मुंबई -अहमदाबाद' या बहुप्रतिक्षित बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे सध्या भारत दौर्‍यावर आले आहेत.

त्यांच्या सोबत पत्नी अकी आबेदेखील आल्या आहेत. भारतात आल्यानंतर अहमदाबाद येथील रोड शोमध्ये त्या भारतीय पेहरावात दिसल्या. केवळ जपानच्या पंतप्रधानाची पत्नी इतकीच  त्यांची ओळख नाही. म्हणूनच अकी आबे यांच्याबद्दल या खास गोष्टीदेखील जाणून घ्या. 

जपानची फर्स्ट लेडी असणार्‍या अकी आबे यांची जपानमध्ये स्वतंत्र  ओळख आहे. 

अकी आबे जपानमध्ये ९०च्या दशकात रेडिओ जॉकी म्हणून काम करत होत्या. श्रोते त्यांना 'अक्की' या नावाने ओळखतात. शिंजो आबेंशी विवाह करण्यापूर्वी त्या जाहिरात क्षेत्रात काम करत होत्या. 

अकी आबे यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला. आबेंचे वडील जपानमधील कंपनी ‘मोरिनगा अँड कंपनी’चे अध्यक्ष होते. 

शिंजो आबे आणि अकी आबे १९८७ साली विवाहबद्ध झाले. 

अकी आबे फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही सक्रिय असतात. 

अनेक समाजकार्यात अकी आबे स्वतःहून सहभाग घेतात. सोबतच त्यांना पर्यावरणविषयक समस्यांची जनजागृती करण्यासाठी अनेक कार्यक्रमामध्ये त्या सहभागी असतात. 

२७ एप्रिल २०१४ साली टोकियोमध्ये समलैंगिक संबंधांना पाठिंबा देण्यासाठी  त्यांनी 'गे परेड'मध्येही सहभाग घेतला होता. 
  
सेंद्रिय शेतीचे अकी आबेंना विशेष कौतुक आहे. 

काही दिवसांपूर्वी  यंत्राद्वारे जमीन नांगरतानाचा अकी आबेंचा फोटो व्हायरल झाला होता.