व्हाइट हाऊसही नाही सुरक्षित

अमेरिकेच्या विशेष सुरक्षा यंत्रणांनी कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्य़ा एकाला अटक केली आहे. 

Updated: Nov 20, 2017, 07:08 PM IST
व्हाइट हाऊसही नाही सुरक्षित title=

वॉशिंटन : अमेरिकेच्या विशेष सुरक्षा यंत्रणांनी कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्य़ा एकाला अटक केली आहे. 

व्हाइट हाऊसच्या सुरक्षेला धोका

व्हाइट हाऊसच्या उत्तर दिशेला असलेलं कुंपण उडी मारून ओलांडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एकाला विशेष सुरक्षा यंत्रणांनी अटक केलीय. सुरक्षा यंत्रणांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्य़ा व्यक्तीची ओळख आणि त्याचा हेतू अजून कळायचं आहे. 

त्यावेळेस ट्रम्प व्हाइट हाऊसमध्य़ेच

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे यावेळी व्हाइट हाऊसमध्य़ेच होते. त्यामुळेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या घटनेचं महत्व मोठं आहे.

वाढत्या घटना

गेल्या काही वर्षात या प्रकारच्या घटना सातत्याने होत असल्यामुळे  सुरक्षा यंत्रणांनी व्हाइट हाऊसच्या कुंपणाजवळ अडथळे उभारले आहेत.