आम्ही भारतात घुसलो तर... चीनची भारताला धमकी

चीनी सैन्य भारतात घुसलं तर भारतात अराजकता पसरेल, अशी धमकी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.

Updated: Aug 22, 2017, 09:54 PM IST
आम्ही भारतात घुसलो तर... चीनची भारताला धमकी title=

नवी दिल्ली : चीनी सैन्य भारतात घुसलं तर भारतात अराजकता पसरेल, अशी धमकी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. चीननं सिक्कीम सीमेवरच्या डोकलाममध्ये रस्त्याची उभारणी केल्यामुळे धोका असल्याचा भारताचा दावाही चीननं फेटाळून लावला आहे.

चीन कोणत्याच देशाला आपली सीमा ओलांडण्याची परवानगी देत नाही. भारतानं रस्ते निर्मितीचं कारण सांगून बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली आहे. भारताचा दावा मान्य केला तर कोणताही देश शेजारी देशामध्ये घुसखोरी करू शकतो. मग आता चीननं भारतात घुसखोरी करायची का असा सवाल चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी केली आहे. चीननं भारतात घुसखोरी केली तर अराजकता माजेल, असंही चुनियंग म्हणालेत.

डोकलाममध्ये चीननं रस्ते बांधायला सुरुवात केल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये सिक्कीमच्या सीमेवर तणाव आहे.