कराचीच्या चाँद नवाबचा आणखी एक 'पराक्रम'

खालील व्हिडीओ हा नुकताच व्हायरल होत असलेला पानातील दुकानातील व्हिडीओ आहे.

Updated: Jun 29, 2018, 02:01 PM IST
कराचीच्या चाँद नवाबचा आणखी एक 'पराक्रम' title=

कराची : पाकिस्तानचे न्यूज रिपोर्टर चाँद नवाब यांचा याआधी, कराची रेल्वे स्टेशनवर ईदची स्टोरी करताना, व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत चाँदभाईंनी ज्या पद्धतीने टेक वर टेक घेतले होते, त्यावरून चाँद नवाब नेटीझन्समध्ये लोकप्रिय झाले होते. चाँद नवाब यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बॉलीवूडमधील एका सिनेमात देखील हे दृष्य, अभिनेता नवाझुद्दीन सिद्धीकीने बजरंगी भाईजान सिनेमात साकारलं होतं. आता चाँद नवाब यांनी आणखी एक पराक्रम केला आहे, तो व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पानाच्या दुकानावर रिपोर्टिंग करताना चाँद नवाब यांनी टेकवर टेक घेतले आहेत. यातील वरील व्हिडीओ हा चाँद नवाब यांचा जुना व्हिडीओ आहे ज्यामुळे ते प्रसिद्धीला आले होते, तर खालील व्हिडीओ हा नुकताच व्हायरल होत असलेला पानातील दुकानातील व्हिडीओ आहे.

खालील व्हिडीओ - चाँद नवाब यांचा सर्वात आधी व्हायरल झालेला व्हि़डीओ, या ईदसाठी त्यांना कराची रेल्वे स्टेशनवर रिपोर्टिंग करताना केला होता, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

खालील व्हिडीओ - अभिनेता सलमान खानची मुख्य भूमिका असलेला बजरंगी भाईजान हा सिनेमात नवाझु्द्दीन सिद्धीकी यांनी देखील हे दृश्य सिनेमात साकारलं होतं, एवढा चाँद नवाब यांचा हा पीटीसी लोकप्रिय झाला होता.

खालील व्हिडीओ - चाँद नवाब यांनी एका प्रसिद्ध पानाच्या दुकानाची स्टोरी करताना, पीटीसी केला. तेव्हा हा देखील टेक वर टेक घेण्यात आल्याने लोकप्रिय होत आहे. व्हायरल होत आहे.