लंडन एअरपोर्टवर दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ

लंडन सिटी एअरपोर्टवर दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 12, 2018, 10:47 AM IST
लंडन एअरपोर्टवर दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ
Photo Credit www.businesstraveller.com

लंडन : लंडन सिटी एअरपोर्टवर दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब

टेम्स नदीजवळील जॉर्ज वी डॉकजवळ हा बॉम्ब आढळला आहे. हा बॉम्ब निष्क्रिय करण्यासाठी तेथे पथक पोहोचलं आहे. यानंतर लंडन सिटी एयरपोर्ट बंद करण्यात आलं आहे. एअरपोर्टच्या दिशेने प्रवास न करण्याच्या सूचना प्रवाशांना देण्यात आल्या आहेत. फ्लाईट संदर्भात माहितीसाठी एअरलाईन्स कंपनीला संपर्क करण्यास सांगितलं आहे.

विमानांची वाहतूक बंद 

सध्या एअरपोर्टवरुन होणारी विमानांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. बॉम्ब निष्क्रिय करणारं पथक आणि रॉयल नेव्ही या बॉम्बला निष्क्र‍िय करण्याचा प्रयत्न करत आहेत.

एअरपोर्टकडे जाणारे रस्ते बंद

एअरपोर्टकडे जाणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. एअरपोर्टवर काही कर्मचारी काम करत असतांना त्यांना हा बॉम्ब सापडला. त्यानंतर याची माहिती एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close