या ब्युटीक्वीनवर चाकू हल्ला, बॉयफ्रेंड देखील झाला जखमी

मिस फ्रांसचा किताब आपल्या नावे केलेल्या मॉडेल मरीन लॉरफेलिनवर एक प्राणघातक हल्ला झाला आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 8, 2018, 09:09 PM IST
या ब्युटीक्वीनवर चाकू हल्ला, बॉयफ्रेंड देखील झाला जखमी  title=

मुंबई : मिस फ्रांसचा किताब आपल्या नावे केलेल्या मॉडेल मरीन लॉरफेलिनवर एक प्राणघातक हल्ला झाला आहे.

चाकूने मॉडेल मरीनवर वार करण्यात आला आहे. या हल्यात मरीन गंभीर जखमी झाली आहे. एवढंच नव्हे तर तिच्यावर झालेल्या या हल्यात तिला वाचवताना बॉयफ्रेंड क्रिस्टोफर देखील जखमी झाला आहे. ही घटना न्यू ईअरच्या संध्याकाळी घडली असल्याचं सांगितलं जातं. हल्लेखोर मरीनवर चाकू हल्ला केल्यानंतर मेट्रो स्टेशनमधून पळून गेला. तीन दिवसानंतर त्याला पोलिसांनी अटक केले आहे. 

या हल्यात मरीनचा लाँग टाइम बॉयफ्रेंड क्रिस्टोपर देखील गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोरासोबत दोन हात करताना त्याला हाथ आणि डोळ्यांच्या खाली इजा पोहोचली आहे. क्रिस्टोफर 2014 पासून मरीनला डेट करत आहे. हल्लेखोरासोबत लढताना तो गंभीर जखमी झाला आहे.  2013 मध्ये मरीनने मिस फ्रांस हा किताब जिंकला आहे. तसेच 2013 मध्ये मिस वर्ल्ड कॉन्टेस्टची फर्स्ट रनर अप राहिली आहे.