मोदी-ट्रंप यांची घोषणा, दोन्ही देशांकडे असेल जगातली सर्वात ताकदवर सेना

आशियान परिषदेसाठी फिलीपींसची राजधानी मनिला येथे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतंत्रपणे एकमेकांशी भेट घेतली.

Updated: Nov 14, 2017, 11:24 AM IST
मोदी-ट्रंप यांची घोषणा, दोन्ही देशांकडे असेल जगातली सर्वात ताकदवर सेना

नवी दिल्ली : आशियान परिषदेसाठी फिलीपींसची राजधानी मनिला येथे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतंत्रपणे एकमेकांशी भेट घेतली. या बैठकीदरम्यान, दोन्ही देशांनी संकल्प केला की जगाच्या दोन महान लोकशाही देशाकडे जगातील सर्वोत्तम सेना असणे आवश्यक आहे.

चीन, पाकिस्तानची उडाली झोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या घोषणेने चीन, पाकिस्तानसह अनेक देशांच्या झोपा उडाल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांनी केलं भारताचं कोतूक

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकाकडून तेल खरेदीचं प्रमाण अलिकडच्या काही महिन्यांत 10 दशलक्ष बॅरल्सवर गेल्याने त्याचं ही कौतूक केलं. पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना आश्वासन दिलं आहे की, 'अमेरिका आणि जगाच्या अपेक्षेवर भारत खरा उतरेल.'

पंतप्रधान मोदींना म्हटलं ग्रेट जेंटलमॅन

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'भारत आणि अमेरिका हितसंबंधांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगभर आशिया व मानवतेच्या भविष्यासाठी काम करत आहेत.' अमेरिकेच्या अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींनी केवळ चांगला मित्रच नव्हे तक एक ग्रेट जेंटलमॅन म्हणून देखील मोदींचा उल्लेख केला आहे.