कुणीतरी किम जोंगला सांगा, माझ्याकडे जास्त शक्तीशाली ‘न्यूक्लिअर बटन’ आहे : डोनाल्ड ट्रम्प

आपल्या डेस्कवर ‘न्यूक्लिअर बटन’ असल्याची धमकी नॉर्थ कोरियाचे नेता किम जोंग उन द्वारे देण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी त्यांना उत्तर दिलंय.

Updated: Jan 3, 2018, 11:43 AM IST
कुणीतरी किम जोंगला सांगा, माझ्याकडे जास्त शक्तीशाली ‘न्यूक्लिअर बटन’ आहे : डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्‍ली : आपल्या डेस्कवर ‘न्यूक्लिअर बटन’ असल्याची धमकी नॉर्थ कोरियाचे नेता किम जोंग उन द्वारे देण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी त्यांना उत्तर दिलंय. त्यामुळे यावर आता किम जोंग उन याच्याकडून प्रतिकिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. 

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘कुणीतरी त्याना(किम जोंग उन)ला सांगा की, माझ्याकडेही एक न्यूक्लिअर बटन आहे. जे त्यांच्यापेक्षाही मोठं आणि पावरफुल आहे’. इतकेच नाहीतर त्यांनी पुढे लिहिले की, माझं हे बटन कामही करतं.

डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सकाळी एक ट्विट केलंय. त्यात ते म्हणाले की, ‘उत्तर कोरियाचे नेता किम जोंग उन नुकतेच म्हणाले की, ‘न्यूक्लिअर बटन’ नेहमीच त्यांच्या डेस्कवर राहतं’. कुणीतरी किम जोंगला सांगा की, माझ्याकडेही परमाणू बॉम्ब आहे. हा त्यांच्या बॉम्ब पेक्षा कितीतरी पटीने मोठा आणि शक्तीशाली आहे. आणि माझं हे बटनही काम करतं’.

किम जोंगने दिली होती धमकी

उत्तर कोरियाचे नेता किम जोंग उन यांनी गेल्या सोमवारी सांगितले होते की, नॉर्थ कोरियाने परमाणू हत्यार तयार केलं आहे आणि याचं बटन नेहमी त्यांच्या डेस्कवर राहतं. उत्तर कोरियाच्या राजकीय वृत्तवाहिनीवर त्यांनी सांगितले की, ‘आम्ही आमच्या देशातील आण्विक शक्तीच्या लक्ष्याला २०१७ मध्ये प्राप्त केलं. त्याचं बटन नेहमी माझ्या डेस्कवर असतं. ही धमकी नाही सत्य आहे’.  

किम जोंग उनची होती ही मागणी

ते पुढे म्हणाले की, ‘उत्तर कोरियाने अमेरिका आणि दक्षिण कोरियांच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी परमाणू शक्ती विकसीत केली आहे. किमने वॉशिंग्टन आणि सियोलमधून संयुक्त सैन्य युद्ध अभ्यास बंद करण्याची मागणी केली होती. हे उत्तर कोरियावर आक्रमण करण्यासारखं असल्याचं ते म्हणाले होते.