आता हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चीनकडून ऑफर

नेहमी भारताला पाण्यात पाहणाऱ्या चीनला उपरती सुचली आहे. जपानने बुलेट ट्रेनसाठी मदत केल्याने चीनचा तीळपापड झालाय. चीनने भारताला हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चक्क ऑफर दिलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 13, 2017, 11:22 PM IST
आता हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चीनकडून ऑफर

नवी दिल्ली : नेहमी भारताला पाण्यात पाहणाऱ्या चीनला उपरती सुचली आहे. जपानने बुलेट ट्रेनसाठी मदत केल्याने चीनचा तीळपापड झालाय. चीनने भारताला हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चक्क ऑफर दिलेय.

जपानचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते उद्या बुलेट ट्रेनचा भूमिपूजन सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे हे दोन्ही नेते बुलेट ट्रेनच्या कामाचा शुभारंभ करणार आहेत. त्याचवेळी चीनने त्याच वेळी भारताला नवी ऑफर दिली आहे.

भारताच्या हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी आम्ही भारताला मदत करू इच्छितो, असे चीनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चीनने यापूर्वीसुद्धा भारताला बुलेट ट्रेनच्या मदतीसाठी ऑफर दिली होती. त्यावेळी भारताकडून चीनला डावलण्यात आले आणि जपानसोबत बुलेट ट्रेन बनवण्यासाठी करार करण्यात आला. 

दरम्यान, चीनकडून दुसऱ्यांदा आलेल्या ऑफरवर भारताने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारतासोबत या क्षेत्रात सहयोग वाढवण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले आहेत. तसेच चीनने चेन्नई-नवी दिल्ली आणि नवी दिल्ली-नागपूरदरम्यानच्या हाय स्पीड ट्रेनच्या संभावित प्रोजेक्टचाही अभ्यास केलाय, असे ते म्हणालेत.