पृथ्वी जवळून जाणार अॅस्ट्रॉईड, नाही होणार नुकसान...

एका खोलीच्या आकाराचा अॅस्ट्राईड गुरूवारी पृथ्वी जवळून जाणार आहे. हा अॅस्ट्राईडमुळे पृथ्वीला कोणतेही नुकसान होणार नाही. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 11, 2017, 09:38 PM IST
   पृथ्वी जवळून जाणार अॅस्ट्रॉईड, नाही होणार नुकसान...

पॅरीस ( एएफपी) : एका खोलीच्या आकाराचा अॅस्ट्राईड गुरूवारी पृथ्वी जवळून जाणार आहे. हा अॅस्ट्राईडमुळे पृथ्वीला कोणतेही नुकसान होणार नाही. 

२०१२ टीसी ४ असे या अॅस्ट्राईडचे नाव आहे. तो साधारण ४४ हजार किलोमीटर अंतरावरून जाणार आहे.  ३६ हजार किमीवर जिथे शेकडो सॅटेलाईट आहेत. त्याच्या वरून हा अॅस्ट्राईड जाणार आहे. 

हा अॅस्ट्राईड चंद्राच्या कक्षेतून जाणार आहे. चंद्राच्या कक्षेत याचा स्पीड २७३०० मैल म्हणजे ४३ हजार ९३५ किलोमीटर आहे. हा स्पीड पृथ्वी आणि चंद्रातील अंतराचा आठवा भाग आहे. 

पाच वर्षा पूर्वी हा शोधण्यात आला होता. त्यामुळे याचे नाव २०१२ असे ठेवण्यात आले आहे. याचा आकार रशियाच्या चेलयाबिंस्क येथील वायूमंडळाच्या वर स्फोट झाला होता, त्या उल्कापिंडा येवढा आहे. याची गतिशील उर्जा हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणूबॉम्बपेक्षा ३० पट अधिक होती.