भारतीय व्यक्तीला मदत करणारी पत्रकार दोन वर्षांनी सापडली

भारतीय गुप्तहेर असल्याचा ठपका ठेवत पाकिस्तानी कारागृहात बंद असलेल्या भारतीय नागरिकाला मदत करणारी पत्रकार अचानक बेपत्ता झाली होती. आता ही महिला पत्रकार दोन वर्षांनंतर सुरक्षा पथकाला सापडली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 22, 2017, 12:06 AM IST
भारतीय व्यक्तीला मदत करणारी पत्रकार दोन वर्षांनी सापडली title=
Image: Social Media

इस्लामाबाद : भारतीय गुप्तहेर असल्याचा ठपका ठेवत पाकिस्तानी कारागृहात बंद असलेल्या भारतीय नागरिकाला मदत करणारी पत्रकार अचानक बेपत्ता झाली होती. आता ही महिला पत्रकार दोन वर्षांनंतर सुरक्षा पथकाला सापडली आहे.

भारतीय नागरिक हामिद अन्सारी याचा शोध घेणारी महिला पत्रकार जीनत शहजादी ही २५ ऑगस्ट २०१५ मध्ये अचानक लाहोरमधून बेपत्ता झाली होती. आता दोन वर्षांनंतर पत्रकार जीनत शहजादी हिची पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवरुन सुटका करण्यात आली आहे.

पत्रकार जीनत शहजादी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी आणि मानवाधिकार संघटनांनी पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेवर अपहरणाचा आरोप केला होता.

आता जीनत सापडल्यानंतर बेपत्ता लाकांच्या संबंधित आयोगाचे अध्यक्ष जस्टिस (रिटायर्ड) जावेद इक्बाल यांनी म्हटलं की, नॉन स्टेट एक्टर्सने तिचं अपहरण केलं होतं. तिला सोडविण्यात बलुचिस्तानने महत्वाची भूमिका पार पाडली.

जीनत शहजादी ही एक फ्रिलांस रिपोर्टर आहे आणि पाकिस्तानमधील बेपत्ता होत असलेल्या नागरिकांसाठी ती नेहमीच काम करत असे. त्याचप्रमाणे भारतीय नागरिक हामिद अन्सारीच्या आईशी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने संपर्क केला. हामिद अन्सारी हे पाकिस्तानातून बेपत्ता झाले होते आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्या शोधात होते.

फौजिया यांची मदत करण्यासाठी जीनतने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मानवाधिकार सेलमध्ये याचिका दाखल केली होती. त्यानंतर तिने न्यायालयाला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर सुरक्षा एजन्सीजने मान्य केलं की हामिद अन्सरी त्यांच्या ताब्यात आहे.