तरुणाच्या पॅंटमध्ये चक्क आढळला अजगर!

जर्मनीत एका माणसाच्या पॅंटमधून चक्क अजगर बाहेर पडला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 10, 2017, 08:32 PM IST
तरुणाच्या पॅंटमध्ये चक्क आढळला अजगर!

नवी दिल्ली : जर्मनीत एका माणसाच्या पॅंटमधून चक्क अजगर बाहेर पडला. तो माणूस पॅंटमधे अजगर घेऊन फिरत होता. या धक्कादायक आणि आश्चर्यकारक घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार १९ वर्षांच्या तरुण नशेमध्ये इतर लोकांशी भांडत होता. तेव्हा लोकांनी पोलीसांना कळवले. तातडीने पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी सगळे प्रकरण शांत केले. तरी देखील तो तरुण रागातच होता. 

त्याचदरमान्य पोलिसांना त्याच्या पॅंटमधे काहीतरी वेगळे असल्याचे जाणवले. मात्र पोलिसांनी विचारणा करताच तो तरुण काही सांगण्यास टाळाटाळ करत होता. पोलिसांनी झडती घेतल्यावर त्याच्या पॅंटमधे अजगराचे पिल्लू असल्याचे आढळून आले. या अजगर सुमारे ३५ सेंटीमीटर लांब होता. 

मात्र अजूनही या घटनेमागचे गूढ कायम आहे. कारण ते अजगराचे पिल्लू त्याच्याकडे कसे आले आणि तो तरुण ते घेऊन का फिरत होता, हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.