भारताने केलेल्या 'या' युतीमुळे चीन घाबरला

हिंदी महासागरात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला एक मोठा झटका बसला आहे.

Updated: Mar 8, 2018, 07:16 PM IST
भारताने केलेल्या 'या' युतीमुळे चीन घाबरला title=

बीजिंग : हिंदी महासागरात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला एक मोठा झटका बसला आहे.

चौकडीला चीन घाबरला

अमेरिका, भारत, जापान आणि ऑस्ट्रेलिया या चौकडीला चीन चांगलाच घाबरला आहे. गुरुवारी चीनने वक्तव्य केलयं की, ज्यावेगाने ही चौकडी उभी राहिली आहे तितक्याच लवकर विखुरली जाईल.

चीनला मोठा झटका

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांनी चतुष्कोणीय सुरक्षा उपक्रमात सहभागी होण्यास उत्सुकता दाखवली आहे. ही सूचना २००७ मध्ये जापानने दिली होती. हिंदी महासागरात वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनला हा एक मोठा झटका बसला असून चीनचे धाबे दणाणले आहेत.

चौकडीकडे सर्वांचं लक्ष मात्र...

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटलं की, "ही चौकडी प्रशांत आणि हिंद महासागरातील समुद्राच्या लाटे प्रमाणे आहे. याकडे सर्वांचं लक्ष जाईल मात्र, हे लवकरच विखुरलं जाईल.

चीनला टार्गेट करण्याचा प्लान?

काही शैक्षणिक जगतातील नागरिक आणि मीडिया संस्थांनी दावा केलाय की, हिंद-प्रशांत महासागरात वर्चस्व निर्माण करणाऱ्या चीनला टार्गेट करणं चार देशांचा प्लान आहे. मात्र, चीनला टार्गेट करणं असा आमचा हेतू नाहीये असं या चारही देशातील अधिकाऱ्यांनी म्हटलयं. 

हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात चीनचा वाढता प्रभाव आणि त्यांचा महत्वाकांक्षी बेल्ट-रोड प्रकल्पामुळे अमेरिका, भारत, जापान, ऑस्ट्रेलिया यांची चिंता वाढली आहे. अरबो डॉलर खर्च करुन बनणाऱ्या या बेल्ट-रोड योजनेला भारताने विरोध केला आहे. कारण, चीन-पाकिस्तान यांच्या आर्थिक परियोजनेचा मुख्य मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. 

ऑस्ट्रेलियातीलही एका गटाचा दावा आहे की, पाकिस्तान-चीनची ही आर्थिक योजना नाहीये तर भू-राजकारणाचा एक हिस्सा आहे. तर, चीनच्या नौसेनेची वाढती ताकद पाहता जापानही चिंतेत आहे.