रशिया ही बेजबाबदार ताकद - अमेरिका

माजी गुप्तहेर आणि त्याच्या मुलीवर विषप्रयोग केल्याचा आरोपही टिलरसन यांनी रशियावर केला आहे.

Annaso Chavare Updated: Mar 13, 2018, 04:58 PM IST
रशिया ही बेजबाबदार ताकद -  अमेरिका

वॉशिंग्टन : रशिया ही जगातील अत्यंत बेजबाबदार आणि जगभरात अस्थिरता पसरवणारी ताकद असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेस्क टिलरसन यांनी केले आहे. तसेच, माजी गुप्तहेर आणि त्याच्या मुलीवर विषप्रयोग केल्याचा आरोपही टिलरसन यांनी रशियावर केला आहे.

सर्गई यांच्या हल्यामागे रशीया - इग्लंडचा आरोप

रशियाचे माजी गुप्तहेर सर्गई स्क्रिपल (वय ६६) आणि मुलगी यूलिया (३३) यांना गेल्या आठवड्यात विष देण्यात आले. एक पोलिस कर्मचारीही या विषप्रयोगाच्या प्रभावाखाली आला होता. तिघांचीही प्रकृती सध्या गंभीर आहे. इंग्लंडचे पंतप्रधान टरीजा यांनी समोवारी म्हटले होते की, या गोष्टीचा प्रचंड शक्यात आहे की, सर्गई स्रिपल यांच्यावर झालेल्या विष प्रयोगामागे रशिया असल्याची शक्यता आहे. मात्र, इंग्लंडच्या रशियाने या आरोपांचे खंडण केले आहे.

इग्लंडच्या तपास यंत्रणेवर अमेरिकेला विश्वास

दरम्यान, पुढे बोलताना टिलरसन यांनी म्हटले आहे की, अमेरिका हा इग्लंडसोबत ठाम उभा राहिल. इंग्लंडच्या तपास यंत्रणेवर अमेरिकेचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या यंत्रणांनी सर्गई यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाबाबत रशियावर व्यक्त केलेल्या संशयाबाबत आम्हालाही खात्री वाटते.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close