शस्त्रक्रियेमुळे नव्हे 'या' मुळे बिघडला तरूणीचा चेहरा

 तेहरान - आपल्या आवडत्या कलाकारांना फॉलो किंवा इंम्प्रेस करण्यासाठी अनेक  चाहते काही हटके मार्ग निवडतात.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 7, 2017, 11:06 PM IST
शस्त्रक्रियेमुळे नव्हे 'या' मुळे बिघडला तरूणीचा चेहरा

 तेहरान - आपल्या आवडत्या कलाकारांना फॉलो किंवा इंम्प्रेस करण्यासाठी अनेक  चाहते काही हटके मार्ग निवडतात.

अ‍ॅंन्जोलिना जोलीच्या चाहतीनेदेखील तिच्यासारखे दिसण्यासाठी ५० शस्त्रक्रिया केल्याची माहिती देत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.  
 
 अ‍ॅन्जोलिना जोलीप्रमाणे दिसण्यासाठी 50 हून अधिक शस्त्रक्रिया केल्याने चेहरा विद्रुप झाल्याचा एक फोटो झपाट्याने शेअर करण्यात आला होता. मात्र आता या मुलीने अजून एक धक्कादायक खुलासा केला आहे.  
 

 काय म्हणाली सहार तबार ? 

 
 सहार तबारचा एक खास फोटो शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये तिने अ‍ॅन्जोलिना जोलीप्रमाणे दिसण्यासाठी 50 शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला आहे. मात्र आता फोटोत दिसणारा चेहरा शस्त्रक्रियेमुळे नव्हे तर केवळ मेकअप आणि फोटोशॉपची कमाल आहे. असे तिने म्हटले आहे. 

 

 

 
 केवळ पब्लिसिटी स्टंट  

 
 सहारने केलेला हा प्रकार केवळ पब्लिसिटी स्टंट होता. यामुले तीला इंस्टाग्रामवर फॉलोवर्स मिळवण्यासाठी झाला आहे.