'ड्रेस कोड'च्या नावानं मुलींना शाळेबाहेर काढलं म्हणून...

अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये शाळेत विद्यार्थीनींना लागू केलेल्या ड्रेसकोडचा निषेध करताना मुलांनी वेगळाच मार्ग निवडलाय. 

Updated: Aug 23, 2017, 05:55 PM IST
'ड्रेस कोड'च्या नावानं मुलींना शाळेबाहेर काढलं म्हणून...  title=

कॅलिफोर्निया : अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये शाळेत विद्यार्थीनींना लागू केलेल्या ड्रेसकोडचा निषेध करताना मुलांनी वेगळाच मार्ग निवडलाय. 

कॅलिफोर्नियाच्या सॅन बेनिटो हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच वर्गातील विद्यार्थीनींना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि शाळेनं लागू केलेल्या ड्रेसकोडला निषेध व्यक्त करण्यासाठी अनोखं आंदोलन केलंय. 

शाळेतील जवळपास २० विद्यार्थीनींना त्यांच्या कपड्यांमुळे प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यांनी ऑफ शोल्डर टॉप परिधान केल्याचं शाळेचं म्हणणं होतं. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचं शाळेचं म्हणणं आहे.  

मात्र, शाळेतील विद्यार्थीनींनाच नाही तर विद्यार्थ्यांना काही शाळेचा हा निर्णय पटला नाही. त्यामुळे मुलांचा एक मोठा ग्रुप मुलींचे कपडे घालून शाळेत दाखल झाला... यावेळी त्यांनी तसेच ऑफ शोल्डर टॉप परिधान केले होते... ज्यामुळे मुलींना शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता. 

सोशल मीडियावर या मुलांचा हा निषेधाचा मार्ग चर्चेच विषय ठरलाय.