'या' छोट्या मुलाची कमाई ऐकून तुम्ही चकीत व्हाल!

वय वर्ष सहा म्हणजे अगदी कोवळं वय, खेळण्या-बागडण्याचं. मात्र या वयात एखादा मुलगा लाखो रुपये कमावतो, असे जर तुम्हाला सांगितले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 24, 2017, 04:23 PM IST
'या' छोट्या मुलाची कमाई ऐकून तुम्ही चकीत व्हाल! title=
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

मुंबई : वय वर्ष सहा म्हणजे अगदी कोवळं वय, खेळण्या-बागडण्याचं. मात्र या वयात एखादा मुलगा लाखो रुपये कमावतो, असे जर तुम्हाला सांगितले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. परंतु, ही अतिशयोक्ती नसून हे खरे आहे. कोचीत राहणारा सहा वर्षांचा निहाल राज हा मुलगा खरोखरच लाखो रुपये कमावतो. तो प्रसिद्ध युट्युबर आणि शेफ आहे. 

हा छोटा शेफ वेगवेगळे पदार्थ तयार करतो. त्याने एका आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला होता. त्याच्या या पाककौशल्यामुळे आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये निहालचं नाव चर्चेत होतं. निहाल सहा वर्षांचा असून लहानपणापासून त्याला आपल्या आईला चविष्ट पदार्थ बनवताना पाहिलं आहे आणि लहानपणापासूनच तो आईला स्वयंपाक करण्यासाठी मदत करू लागला. हळूहळू ही आवड वाढत गेली. मग साध्या रेसिपीज तो करू लागला. 

निहालच्या वडिलांनी त्याचा व्हिडिओ तयार करून तो आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला. निहालच्या कौशल्याचं मित्रपरिवार, नातेवाईकांकडून खूप कौतुक झालं. २०१५ मध्ये निहालच्या वडिलांनी युटयूब चॅनेल सुरू केलं. या युट्यूब चॅनेलला प्रेक्षकांची मोठा प्रतिसाद मिळाला. निहालचे व्हिडिओ फेसबुकवरही शेअर केले जातात. यातून तो दरमहा लाखो रुपये कमावतो. निहालने काही महिन्यांपूर्वी आंब्याच्या आईस्क्रीमची रेसिपी शेअर केली होती. ती खूपच प्रसिद्ध झाली आणि या रेसिपीसाठी फेसबुकने निहालला जवळपास १ लाख ३० हजार रुपये देऊन या व्हिडिओचे हक्क विकत घेतले. सध्या निहाल या सगळ्यामधून महिन्याला तब्बल पाच लाखांहून अधिक कमाई करतो.