2018 मध्ये होणार मोठे शक्तिशाली भूकंप

अमेरिकेच्या दोन शास्त्रज्ञांनी 2018 मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

Updated: Nov 20, 2017, 09:50 PM IST
2018 मध्ये होणार मोठे शक्तिशाली भूकंप title=

वॉशिंटन : अमेरिकेच्या दोन शास्त्रज्ञांनी 2018 मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

कोण आहेत ते शास्त्रज्ञ

कोलोरॅडो युनिव्हर्सिटीचे रॉजर बिलहॅम आणि मोंटाना युनिव्हर्सिटीचे रेबेका बेंडीक या दोन शास्त्रज्ञांनी हे भाकित वर्तवलं आहे. जिओलोजीकल सोसायटी ऑफ अमेरिका इथे झालेल्या वार्षिक परिषदेत त्यांनी आपलं संशोधन सादर केलं.

नेमकं काय होणार आहे

पृथ्वीच्या स्वत:भोवती प्रदक्षिणा घालण्याच्या गतीशी य़ाचा संबंध आहे. याचा परिणाम दिवसाच्या लांबीवर होतो. पृथ्वीच्या गतीमुळे होणारे हे बदल अतिशय सूक्ष्म असतात परंतु त्याचा परिणाम हा मोठा असतो. मोठ्या प्रमाणात उर्जा त्यातून मुक्त होते. यामुळेच मोठे भूकंप येतात.

संशोधनाचा फायदा

2018 हे वर्ष असंच मोठ्या भूकंपांचं असणार आहे. या दोन शास्त्रज्ञांच्या भाकितामुळे 2018 आणि त्यानंतरच्या पाच वर्षात होणाऱ्या मोठ्या भूकंपामुळे होणारे हानीची तीव्रता कमी करता येईल.