'या' गावात राहणाऱ्या व्यक्तीला सरकार देणार ४५ लाख रुपये

असं एक गाव आहे जेथे राहणाऱ्या व्यक्तीला सरकार लाखो रुपये देणार आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 24, 2017, 02:34 PM IST
'या' गावात राहणाऱ्या व्यक्तीला सरकार देणार ४५ लाख रुपये title=

नवी दिल्ली : शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने अनेकजण शहरांची वाट धरतात. शहरात नोकरी-धंदा करुन आपला उदरर्निर्वाह करतात. पण असं एक गाव आहे जेथे राहणाऱ्या व्यक्तीला सरकार लाखो रुपये देणार आहे.

सरकार देणार ४५ लाख रुपये

एक असं गाव आहे जेथे राहणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून ४ लाख रुपये देण्यात येणार आहेत. आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरं आहे.

सरकारची खास ऑफर

स्वित्झर्लँडमधील एका गावात राहणाऱ्या परिवारांना ५३ हजार ब्रिटिश पाऊंड (जवळपास ४५ लाख ५० हजार रुपये) देण्याची ऑफर आहे. 

गावात केवळ २४० ग्रामस्थ 

'द सन' ने दिलेल्या वृत्तानुसार, स्वित्झर्लँडमधील माऊंटन व्हिलेज अल्बिनेनमध्ये ग्रामस्थांची कमतरता आहे. या गावात राहणाऱ्या परिवाराला शहरांचं आकर्षण आहे त्यामुळेच सर्वजण शहरांकडे स्थलांतर करत आहेत. यामुळे गावात आता केवळ २४० ग्रामस्थच राहीले आहेत.

albinen, swiss village, 45 lac offer for moving, अल्बिनेन

शाळाही झाली बंद

गेल्यावर्षी या ठिकाणाहून तीन परिवारांनी शहरात स्थलांतर केलं. गावात बनलेली घरं ओस पडत आहेत. गावात सर्व सुविधाही आहेत. मात्र, ग्रामस्थ शहरांकडे जात असल्याने आता केवळ ७ मुलंच गावात राहीली आहेत. त्यामुळे गावातील शाळाही बंद झाली आहे. आता ही मुलं दुसऱ्या गावातील शाळेत शिक्षणासाठी जात आहेत.

...म्हणून गाव पडत आहे ओस

गावातील नागरिक नोकरी-धंदा करण्यासाठी शहरांमध्ये जात आहेत.

albinen, swiss village, 45 lac offer for moving, अल्बिनेन

खास योजना

गावातील लोकसंख्या वाढवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने एक खास प्लान आखला आहे. त्यानुसार गावात गुंतवणूक करण्यात येणार आहे. तसेच ४५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील नागरिकांसाठी खास ऑफर देण्यात येत आहे.

स्वित्झर्लँडमधील हे गाव समुद्र सपाटीपासून जवळपास ४२६५ फूट उंचीवर आहे. मनपा अध्यक्षा बीट जोस्ट यांनी सांगितले की, शांतता, प्रेक्षणीय ठिकाण, ताजी ही या गावाची खास बाब आहे. सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या ऑफरनुसार नागरीक गावामध्ये जमीन खरेदीकरुन आपलं घर बांधू शकतात.

मात्र, आहे एक अट

स्थानिक प्रशासनाने गावात स्थायिक होणाऱ्या परिवारांसाठी काही अटी ठेवल्या आहेत. या अटींनुसार, सबसिडीचा लाभ घेणाऱ्या परिवारांना गावातील काही नियम-कायदे पाळावे लागणार आहेत. त्यानुसार, गावात येणारा कुठलाही परिवार आपलं घर बांधून किंवा खरेदी केल्यानंतर १० वर्षांनंतरही गाव सोडून गेला तर त्याला पैसे परत द्यावे लागणार आहेत.