अँकरनं लाईव्ह टीव्हीवर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज!

'ज्वेज्दा टीव्ही'ची न्यूज अँकर डेनिसनं त्याची गर्लफ्रेंड मार्गरिटा स्टेपानोवा हिला लाईव्ह बुलेटीनमध्ये प्रपोज करत लग्नाची मागणी घातली.

Updated: Aug 12, 2017, 10:53 PM IST
अँकरनं लाईव्ह टीव्हीवर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज!

मुंबई : 'ज्वेज्दा टीव्ही'ची न्यूज अँकर डेनिसनं त्याची गर्लफ्रेंड मार्गरिटा स्टेपानोवा हिला लाईव्ह बुलेटीनमध्ये प्रपोज करत लग्नाची मागणी घातली.

डेनिसचा दिवस फारच बोअर सुरू होता... चॅनलवर चांगल्या बातम्याही नव्हत्या. अशात त्यानं हा दिवस चांगलाच लक्षात राहणार याची पुरेपूर काळजी घेतली. आपली गर्लफ्रेंड हा कार्यक्रम पाहत असेल याची डेनिसला खात्री होती... 

त्यामुळे तो आपल्या डेस्कवरून उठला, स्टुडिओभर फिरला आणि आपल्या खिशातून एका लाल रंगाचा बॉक्स काढला... स्टुडिओच गुडघ्यावर बसून त्यानं मार्गरिटाला चक्क लग्नाची मागणी घातली.

'मार्गरिटा, तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल? मी तुझ्या उत्तराची वाट पाहील आणि मला खात्री आहे तुझं उत्तर हो असंच असेल' असं त्यानं कॅमेऱ्यात पाहत म्हटलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, मार्गारिटानंही डेनिसचं हे प्रपोजल स्वीकारलंय.