दोन रेल्वेगाड्यांमध्ये समोरासमोर धडकल्या

Last Updated: Saturday, August 12, 2017 - 16:42
दोन रेल्वेगाड्यांमध्ये समोरासमोर धडकल्या

मिस्त्र : मिस्त्रमध्ये अलेक्झांड्रिया शहरात दोन रेल्वेगाड्यांमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत 37 जणांचा बळी गेला आहे, तर 123 जण जखमी झाले आहेत. 

या अपघातात रेल्वेचे अनेक डबे रुळावरुन घसरले. हा भीषण अपघात खुर्शीद स्टेशनवर झाला. या अपघातात जखमी झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

 अपघात झाला तेव्हा प्रचंड मोठा आवाज झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, अपघाताचं नेमकं कारण अजून कळू शकलेलं नाही.

First Published: Saturday, August 12, 2017 - 16:42
comments powered by Disqus