अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला भारताचा दणका, ब्रिटनमधली सगळी संपत्ती जप्त

अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधली सगळी संपत्ती ब्रिटीश सरकारनं जप्त केली गेली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली होती.

Updated: Sep 13, 2017, 12:05 PM IST
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला भारताचा दणका, ब्रिटनमधली सगळी संपत्ती जप्त title=

लंडन : अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधली सगळी संपत्ती ब्रिटीश सरकारनं जप्त केली गेली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली होती.

भारतानं दाऊदच्या मालमत्तांच्या पुराव्यांची कागदपत्र ब्रिटनकडे सोपवली होती. त्यानुसार कारवाई करून आता ब्रिटीशांनी दाऊदची अब्जावधीची काळी संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात ब्रिटीश सरकारनं भारताच्या गृहखात्याला माहिती दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी ब्रिटीशच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केल्यानंतर झालेली ही कारवाई पंतप्रधान मोदींचं यशच म्हणावं लागेल.