'भारत बनवित आहे असे आण्विक क्षेपणास्त्र की संपूर्ण चीन नष्ट होऊ शकतो'

भारत चीनचा वाढता धोका लक्षात घेऊन आण्विक क्षेपणास्त्रावर भर देत आहे. अत्याधुनिक आण्विक क्षेपणास्त्र बनविण्याची रणनीती भारताने आखली आहे.  तसेच पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरी होत आहे. त्यामुळे चोक प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने लक्ष केंद्रीत केलेय. आता तर चीनकडे भारताने विशेष लक्ष केंद्रीत केलेय, अशी माहिती अमेरिकेतील दोन वरिष्ठ आण्विक क्षेपणास्त्र अभ्यासकांनी दिलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 13, 2017, 01:42 PM IST
'भारत बनवित आहे असे आण्विक क्षेपणास्त्र की संपूर्ण चीन नष्ट होऊ शकतो'

वॉशिंग्टन : भारत चीनचा वाढता धोका लक्षात घेऊन आण्विक क्षेपणास्त्रावर भर देत आहे. अत्याधुनिक आण्विक क्षेपणास्त्र बनविण्याची रणनीती भारताने आखली आहे.  तसेच पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरी होत आहे. त्यामुळे चोक प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने लक्ष केंद्रीत केलेय. आता तर चीनकडे भारताने विशेष लक्ष केंद्रीत केलेय, अशी माहिती अमेरिकेतील दोन वरिष्ठ आण्विक क्षेपणास्त्र अभ्यासकांनी दिलेय.

१२०-१३० आण्विक क्षेपणास्त्र

'आफटर निडनाइट'च्या जुलै-ऑगस्टच्या नवी अंकात एक लेख प्रकाशित झालाय. यात दावा करण्यात आला आहे की, भारत असे आण्विक क्षेपणास्त्र बनवत आहे. ज्यामुळे दक्षिण भारतातील आपला पाया संपूर्ण चीनला निशाणी बनवितो. 'इंडियन न्यूक्यिर फोर्स २०१७' असे शीर्षक असलेल्या लेखात हॉन्स एम क्रिस्टनन्सन आणि रॉबर्ट एस नॉरिस यांनी लिहिलेले आहे, भारत १५०  ते २०० आण्विक क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी पुरेसे प्लूटोनियम साठवले आहे, पण ते १२० ते १३० आण्विक क्षेपणास्त्र निर्माण केले आहे.

चीनला डोळ्यासमोर ठेवून आण्विक क्षेपणास्त्र

या दोन अभ्यासकांनी दावा केलाय की, परंपारित शत्रू पाकिस्तानवर आधारित भारताचे परमाणु धोरण ठरत होते. आता चीनच्या कारवाई लक्षात घेता अधिक जोर भारत देत आहे. भारताने पारंपरिक रूपाने पाकिस्तानच्या हालचाली नुसार आपल्या सुरक्षेसाठी आण्विक शस्त्रे विकसित करणे सुरू केले आहे. परंतु परमाणु आधुनिककरण हे भविष्यावरील  चीनच्या संबंधांकडे अधिक लक्ष देत आहे.