व्हिडिओ : न्यूज अँकरनं लाईव्ह टीव्हीवर दिलं आपल्याच मुलीच्या मृत्यूचं वृत्त

'या घटनेनं माझं संपूर्ण जीवनचं उद्ध्वस्त केलंय' 

Updated: Sep 11, 2018, 11:41 AM IST
व्हिडिओ : न्यूज अँकरनं लाईव्ह टीव्हीवर दिलं आपल्याच मुलीच्या मृत्यूचं वृत्त  title=

नवी दिल्ली : अमेरिकेच्या एका महिला पत्रकारानं एक धाडसाचं काम केलंय. अमेरिकेच्या दक्षिण डकोटामध्ये एका महिला अँकरनं आपल्या 21 वर्षांच्या मुलीचं वृत्त स्वत:च लाईव्ह टीव्हीवर दिलं. 'नशेमुळे मृत्यूचं वृत्त मी अनेकदा टीव्हीसमोर दिलं... पण, मला माहीत नव्हतं की याच नशेच्या आहारी जाऊन माझ्या कुटुंबातील कुणी बळी पडेल' असं त्यांनी लाईव्ह टीव्हीवर म्हटलं. 

अमेरिकेसहीत जगातील अनेक देशांतील तरुण सध्या ड्रग्जच्या सवयीचा सामना करत आहेत. सध्या ऑपिओडचा (वेदनाशामक औषध ज्याचा उपयोग नशेसाठीही केला जातो) वापर अमेरिकेत एखाद्या रोगाप्रमाणे फैलावतोय. '16 मे रोजी माझ्या 28 वर्षांची मुलगी एमिला ऑपिओडच्या ओव्हरडोसची शिकार झाली आणि तिचा मृत्यू झाला... या घटनेनं माझं संपूर्ण जीवनचं उद्ध्वस्त केलंय' असं महिला अँकरनं भावूक होत म्हटलं. 

तरुणांमध्ये ड्रग्जची वाढती सवय लक्षात घेता आपल्याला त्यावर चांगले आणि स्वस्त उपाय शोधावे लागतील... मानहानीची भीती मनातून काढून आपल्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तीला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करावी लागेल, असंही त्यांनी म्हटलं.  

उल्लेखनीय म्हणजे, रोग नियंत्रण आणि आळा केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सिओडोन, हायड्रोकोडोन तसंच मॉर्फिनसारख्या प्रिन्सिपल ऑपिओड औषधांमुळे अमेरिकेत 1999 मध्ये मृत्यूचा आकडा चौपट वाढला होता.