काबुल हल्ल्यानंतर अमेरिकेने दिली पाकिस्तानला दिली धमकी

अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला ताकीद दिली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला तालिबानी नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी किंवा काबुलमधून काढून टाकण्यासाठी ताबडतोब धमकी दिली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 23, 2018, 12:42 PM IST
काबुल हल्ल्यानंतर अमेरिकेने दिली पाकिस्तानला दिली धमकी title=

नवी दिल्ली : अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला ताकीद दिली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला तालिबानी नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी किंवा काबुलमधून काढून टाकण्यासाठी ताबडतोब धमकी दिली आहे.

पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या तालिबानच्या नेत्यांनी भारतीय दूतावासावर सैन्याच्या मदतीने देखील हल्ला केला होता. याशिवाय, तालिबानच्या दहशतवाद्यांना पाकिस्तान आर्मीच्या मदतीने अफगाणिस्तानमध्ये हल्ला केला होता.

सोमवारी रात्री व्हाईट हाऊसमधील बैठकीनंतर प्रेस सेक्रेटरी साराह सेंन्डर्स यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सेंन्डर्स म्हणाल्या की, "आम्ही पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले आहे की तालिबान नेत्यांना लगेच अटक करावी किंवा त्यांना देशांतून बाहेर काढावे. हे अतिरेकी पाकिस्तानच्या भूमीतून या कारवाया करत आहेत.'

'पाकिस्तानमध्ये आश्रय घेणारे हे दहशतवादी शेजारच्या देशांत हल्ला करतात हे आता सहन केलं जाणार नाही.' इंटरकांटिनेंटल हॉटेलवरील हल्ल्याची तालिबानने जबाबदारी घेतली होती. हल्ल्यामध्ये 22 लोकं ठार झाली होती.

'काबुलच्या सर्वात मोठ्या हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आमचं अफगाणिस्तानसोबत संबंध आणखी घट्ट झाले आहेत. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की अमेरिका आपल्या मित्राला आता चांगल्या मार्गाने मदत करेल.'

'हल्ल्यानंतर अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी फार चांगले आणि जलद कार्य केले. अमेरिकन सैनिकांनी देखील ऑपरेशनमध्ये त्यांना मदत केली. अफगाणिस्तानचे शत्रू कोठेही असोत अमेरिका त्यांना नाही सोडणार.'