...अन् हवेत उडणारी कार पोहोचली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर

आजपर्यंत तुम्ही अपघाताचे अनेक फोटो किंवा व्हिडिओज पाहीले असतील. मात्र, अमेरिकेतील कॅलिफोर्नियात एक असा अपघात घडला जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 15, 2018, 05:35 PM IST
...अन् हवेत उडणारी कार पोहोचली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर title=
Image: @OCFA_PIO twitter

नवी दिल्ली : आजपर्यंत तुम्ही अपघाताचे अनेक फोटो किंवा व्हिडिओज पाहीले असतील. मात्र, अमेरिकेतील कॅलिफोर्नियात एक असा अपघात घडला जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

...आणि कार पोहोचली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर

कॅलिफोर्नियात एक भरधाव वेगात असलेल्या कार चालकाने आपलं नियंत्रण गमावलं आणि डिवायडरला धडक दिली. यानंतर गाडी इतक्या उंचावर उडाली की थेट समोरील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दाखल झाली.

दृश्य पाहून सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले. त्यानंतर समोरील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. ऑरेंज काऊंटी फायर अथॉरिटीने बिल्डिंगमध्ये घुसलेल्या कारचा फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.

अपघातानंतर लागली आग

मिळालेल्या माहितीनुसार, सफेद रंगाची सेडान कार इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचली. हा अपघात इतका भयानक होता की कार इमारतीला धडकताच आग लागली.

कारचालक कारमध्येच अडकला आणि...

घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचावकार्य सुरु केलं. दुर्घटनेनंतर एक व्यक्ती कारमधून बाहेर पडला मात्र, कारचालक कारमध्येच अडकला होता. त्याला बऱ्याच प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं.

नशेत होता कारचालक

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने इमारतीत घुसलेली कार बाहेर काढली. दोन्ही जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक घटनेच्यावेळी दारुच्या नशेत होता. नशा आणि कारचा स्पीड अधिक असल्याने हा अपघात झाला.