कॅन्सरशी झगडणाऱ्या महिलेने मृत्यूच्या काही तासांपूर्वी केले लग्न

  खऱ्या प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात,  हिथर मॉशेर आणि डेव्हिड मॉशेर यांच्या प्रेमातून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे.  एखाद्याचे लग्न ठरल्यावर मंदीर किंवा चर्च सजवले जाते पण या ठिकाणी एक हॉस्पिटल सजविण्यात आले होते. 

Updated: Jan 3, 2018, 06:45 PM IST
 कॅन्सरशी झगडणाऱ्या महिलेने मृत्यूच्या काही तासांपूर्वी केले लग्न

कॉनेक्टीकट :  खऱ्या प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात,  हिथर मॉशेर आणि डेव्हिड मॉशेर यांच्या प्रेमातून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे.  एखाद्याचे लग्न ठरल्यावर मंदीर किंवा चर्च सजवले जाते पण या ठिकाणी एक हॉस्पिटल सजविण्यात आले होते. 

हिथर आणि डेव्हिड यांचे लग्न अमेरिकेतील कॉनेक्टीकट या शहरातील हॉस्पीटलमध्ये झाले. गेल्या २२ डिसेंबर २०१७ रोजी हा विवाह संपन्न झाला आणि त्याच्या १८ तासांनी हिथरचे निधन झाले.  हिथरला ब्रेस्ट कँन्सर झाला होता. 

 

या दोघांचा विवाह सेंट फ्रान्सिस हॉस्पीटलमध्ये झाला.  हॉस्पिटलच्या बेडवर असलेली हिथरने आयव्ही ट्यूब लावल्या होत्या तसेच तिला सलाइन चढविलेले होते. पण अशा परिस्थितीतही तीने छानसा वेडिंग गाऊन घातला होता. आपले लग्न ती एन्जॉय करत होती. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांच्या डोळ्याच्या कडा पाणावत आहे. 

 

 

डेव्हीड या आपल्या प्रियकराशी हिथरने हॉस्पिटलच्या बेडवर लग्न केले पण हे लग्नाचा आनंद त्यांना केवळ १८ तास घेता आला. त्यानंतर हिथरची प्रकृती खालावली आणि तीचे आजाराने निधन झाले. 

हिथर ही मानसोपचार तज्ञ होती, तिची ओळख डेव्हिडशी एका डान्सिंग क्लासमध्ये झाली. त्याने २३ डिसेंबर २०१६ रोजी तिला लग्नाची मागणी घातली होती. पण त्याच वेळी तिला कॅन्सर डिटेक्ट झाला. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close