भारत आणि चीन लष्करांपैकी कोण शक्तीशाली?

भारताकडे एकमेव प्लसपाईंट आहे, सुखोई 30 एमकेआय.दुसरीकडे सैनिक, लढाऊ विमानांची संख्या, रणगाडे यांची संख्या भारतापेक्षा कितीतरी पट चीनकडे जास्त आहे.

Updated: Jul 7, 2017, 06:19 PM IST
भारत आणि चीन लष्करांपैकी कोण शक्तीशाली? title=

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या लष्कराची तुलना केली तर चीनचा बजेट भारतापेक्षा तीनपटीने जास्त आहे, भारताकडे एकमेव प्लसपाईंट आहे, सुखोई 30 एमकेआय.दुसरीकडे सैनिक, लढाऊ विमानांची संख्या, रणगाडे यांची संख्या भारतापेक्षा कितीतरी पट चीनकडे जास्त आहे.

भारत आणि चीनची वायुसेना

चीनकडे भारतापेक्षा जास्त लढाऊ विमानं आहेत, मात्र भारताच्या सुखोई ३० एमकेआयला स्पर्धा करणारी विमानं चीनकडे नाहीत. 
भारताचे सुखोई ३० एमकेआय हे चीनच्या सुखोई ३० एमकेएमपेक्षा कितीतरी पटीने शक्तीशाली आहे.
भारतीय सुखोई ३० एमकेआय  एकाचे वेळी २० ठिकाणी निशाणा साधू शकतं, तर चीनी सुखोई ३० एमकेएम फक्त एकावेळी २ ठिकाणी.
भारतीय चीन सीमेची भौगोलिक परिस्थिती भारतीय वायुसेनेच्या बाजूने आहे.
युद्धाच्या परिस्थितीत चीनी विमानांना तिबेटच्या उंच पठारावरून उड्डाण करावं लागेल.
पण सध्या चीनी विमानात जास्त स्फोटकं लादली जाऊ शकत नाही, किंवा इंधन भरलं जाऊ शकत नाही.
चीनी विमानांमध्ये हवेत इंधन भरण्याची क्षमताही फार कमी आहे.

भारत आणि चीनच्या लष्कराची ताकद

भारतात जर लष्करात युवकांची भरती झाली, तर चीनजवळ असे तरूण १ कोटी ९५ लाख आहेत, तर भारताकडे २ कोटी ३० लाख
पण सक्रीय सैनिकांच्या बाबतीत चीन भारचापेक्षा पुढे आहे. चीनकडे २२ लाख सक्रिय सैनिक आहेत. तर भारताकडे १२ लाख सैनिक आहेत.
लष्कराच्या ताकदीची तुलना केली तर, चीनकडे ६ हजार ४५७ कॉम्बॅट टँक आहेत. भारताक़डे ४ हजार ४२६ कॉम्बॅट टँक आहेत.

भारत आणि चीनची हवाई ताकद

आर्म्ड व्हेईकल्स चीनकडे ४ हजार ७८८ आहेत, तर भारताकडे ६ हजार ७०४ आहेत. 
जर दोन्ही देशांची लढाऊ विमानांची तुलना केली तर चीनकडे २ हजार ९५५ लढाऊ विमानं आहेत, तर भारताकडे २ हजार १०२ विमानं आहेत.

आता भारत आणि चीनच्या नेव्हीची शक्ती पाहा

चीनकडे लहान मोठे ७१४ नेव्हल असेट्स आहेत, तर भारताकडे २९५ नेवल असेट्स आहेत.
चीनकडे १ एअरक्राफ्ट कॅरिअर आहे, तर भारताकडे असे ३ आहेत.
चीनकडे ३५ डेस्टोयार्स  - विध्वंसक युद्ध नौका आहेत, तर भारताकडे ११ डेस्टोयार्स आहेत.
चीनकडे ६८ सबमरिन्स-पानबुड्या आहेत, तर भारताकडे १५ आहेत.
चीनचा संरक्षण बजेट आहे १० लाख ५० हजार कोटी, तर भारताचा संरक्षण बजेट आहे ३ लाख ३० हजार कोटी.