दोन विमानांची धडक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

दोन विमानांची धडक झाल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याचं पहायला मिळत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 8, 2018, 11:53 PM IST
दोन विमानांची धडक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल title=
Image: Screen Grab

नवी दिल्ली : दोन विमानांची धडक झाल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याचं पहायला मिळत आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

टोरंटो पियरसन एअरपोर्टवर शुक्रवारी २ पॅसेंजर विमानांची एकमेकांसोबत धडक झाली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

सनविंग एअरलाईन्सच्या विमानाला खेचत असताना त्याचे पंख वेस्टजेट एअरलाईन्सच्या विमानाला धडकले. या विमानात १६८ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. 

वेस्टजेट एअरलाईन्सच्या विमानात उपस्थित असलेल्या प्रवाशांपैकी अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ शूट केले आणि सोशल मीडियात पोस्ट केले आहेत.

विमानात बसलेले प्रवासी स्टेफिन बेलफोर्ड यांनी व्हिडिओ पोस्ट करत इंस्टाग्रामवर लिहिलं आहे की, विमानाच्या पायलटने आम्हाला सूचना दिली की सनविंग एअरलाईन्सच्या विमानाने धडक दिली आहे. व्हिडिओत दिसत आहे की, विंगमधून आग निघत आहे ज्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले.

आग लागताच प्रवाशांनी धावाधाव करण्यास सुरुवात केली. मात्र, क्रू मेंबर्सने त्यांना बसण्याचा सल्ला दिला.

दोन विमानांची धडक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल