|
जलसंपदा विभागात घोटाळा झाल्याचे आरोप मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला हा राज्याने खूप मोठा राजकीय भूकंप २०१२ मध्ये अनुभवला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आरोपातून मुक्त होईलपर्यंत पदमुक्त राहील अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. या दरम्यान पक्षाचे काम करीत राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले होते.
जलसंपदामंत्री असताना तीन महिन्यांत सर्व नियम डावलून २० हजार कोटींच्या निधीचं वाटप केल्याचा विरोधकांचा आरोप होता. राजीनामा दिल्यानंतर अर्थमंत्रीपद जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात यावं, उर्जा मंत्रालय राजेश टोपेंकडे सोपवण्यात यावं असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले होते.
जलसंपदा विभागातील मुख्य अभियंता विजय पांढरेंनी त्यांच्या खात्यातील घोटाळे चव्हाट्यावर मांडला होते. मागील वीस वर्षात ६० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा पांढरेंनी केला होता. राज्यातील ९० टक्के उपसा सिंचन योजना बंद असल्याचं त्यांनी तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट केलंय. वादग्रस्त तेरा विषयांवर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनीच केल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.
पांढरे पत्रानं जलसंपदा विभागाच्या कारभाराचे धिंडवडे काढलेत. जलसंपदा विभागातील मेरी संशोधन संस्थेत महाराष्ट्र प्रशिक्षण प्रबिधीनीचे मुख्य अभियंता असलेल्या विजय पांढरेंनी पाटबंधारे अधिकारी, राजकीय नेते आणि ठेकेदार कशी लूट करताहेत हे स्पष्ट केलंय. मांजरपाडा प्रकल्प, गोसीखुर्द ,तापी पाटबंधारे,कोकणातील योजना आणि कृष्णा खोऱ्यातील अनेक धरणांच्या बांधकामातील गोंधळ त्यांनी उघड केला आहे. खोऱ्यात पाणी उपलब्ध नसताना दर्जाहीन कामे केली जात असून पन्नास कोटीचे पाचशे कोटीत केले जात असल्याचं गंभीर आरोप त्यांनी केले होते.
|