Chhatrapati Sambhajinagar Municipal Election: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं बंडखोरांची समजूत काढली खरी पण खरी डोकेदुखी भाजपच्या माजी कार्यकर्त्यांमुळं होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर जवळपास 29 भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून इतर पक्षातून उमेदवारी मिळवलीये. त्यामुळं निवडणुकीत भाजपच्या आजी माजी कार्यकर्त्यांत लढाई पाहायला मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत कसा सामना असेल याचं चित्र स्पष्ट झालंय. संभाजीनगरात सर्वात जास्त बंडखोरी भाजपात झाली होती. भाजपनं तिकीट न दिल्यानं जवळपास 86 अपक्षांनी भाजपविरोधात उमेदवारी दाखल केली होती. त्यातल्या 90 टक्के उमेदवारांनी माघार घेतल्याचा दावा भाजपनं केलाय. अपक्ष उमेदवार म्हणून बंडखोरी करणा-यांची समजूत काढण्यात भाजपला यश आलंय. पण भाजपनं तिकीट न दिल्यानं इतर पक्षातून उमेदवारी मिळवणा-या माजी कार्यकर्त्यांनीही भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण केलंय.
भाजप सोडून 18 जणांनी शिवसेनेची उमेदवारी मिळवली
13 जण भाजप सोडून राष्ट्रवादीत उमेदवार
8 जणांनी भाजपला रामराम करुन घेतली ठाकरेंची मशाल
भाजपचे माजी कार्यकर्ते इतर पक्षातून लढत असले तरी ते भाजपच्य़ाच मतदारांवर डोळा ठेऊन असणार हे उघड सत्य आहे. साहजिकच याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. पण भाजप नेत्यांना हे फार मोठं आव्हान वाटत नाही.
भाजपच्या पूर्वाश्रमीच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षात जाऊन उमेदवारी मिळवल्याच्या मुद्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी भाजपची फिरकी घेतलीय. इतर पक्षांचे नेते भाजपमध्ये घेताना भाजपला काही वाटत नाही, आता भाजप कार्यकर्ते इतर पक्षात जाऊन आव्हान देतायत हे का झोंबतं असा सवाल दानवेंनी केलाय.
भाजपनं अन्याय केला म्हणून इतर पक्षांची वाट धरणा-या या माजी भाजप कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच त्वेष आहे. निवडणुकीत भाजपचे माजी कार्यकर्त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या तोंडाला फेस आणला नाही तर मिळवलं...
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.