Maharashhtra ZP Election Results : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निकाल जाहीर झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त एका मतामुळे राजकारण बदलले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अपक्ष उमेदवाराने शिंदे गटाच्या उमेदवाराचा एका मताने पराभव केले आहे. एक मताने जिंकलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या या अपक्ष उमेदवाराची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे.
संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटात लागलेला निकाल सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे. वडगाव कोल्हाटी गटात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांचा एक मतांनी विजय झाला आहे. सचिन गरड यांनी शिंदे गटाचे हनुमंत भोंडवे यांचा पराभव केला आहे.
एक मताने निवडून आलेल्या गरड यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले. वाळू माफियांच्या आणि ताकदवार उमेदवारांच्या विरोधात लढलो जनतेने मी सामान्य असतांनी निवडून दिले त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया गरड यांनी दिली झालेला पराभव मान्य करतो, एक मताने की होईना पराभव असतो आणि त्या एका मताची आज किंमत कळली अशी प्रतिक्रिया हनुमंत भोंडवे यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निकाल : एकूण ९ पंचायत समिती -
छत्रपती संभाजीनगर एकूण - 20
भाजप : 6
शिवसेना : 6
शिवसेना UBT: 5
NCP : 0
MIM : 1
काँग्रेस : 1
इतर : 1
पैठण तालुका - 18
भाजप : 0
शिवसेना : 12
शिवसेना UBT: 3
NCP : 2
काँग्रेस : 1
इतर :
गंगापूर तालुका - 18
भाजप : 6
शिवसेना : 2
शिवसेना UBT:2
NCP : 5
एमआयएम : 1
इतर : 2
वैजापूर तालुका - 16
भाजप : 3
शिवसेना : 5
शिवसेना UBT: 2
NCP : 4
NCP SP :
Other : 2
कन्नड तालुका - 16
भाजप : 5
शिवसेना : 6
शिवसेना UBT:
NCP : 1
काँग्रेस : 2
इतर : 2
खुलताबाद तालुका - 6
भाजप : 3
शिवसेना :
शिवसेना UBT: 1
NCP : 2
फुलंब्री तालुका - 8
भाजप : 3
शिवसेना : 2
शिवसेना UBT: 1
NCP SP : 1
काँग्रेस : 1
सिल्लोड तालुका - 18
भाजप : 6
शिवसेना : 6
शिवसेना UBT:
NCP :
सोयगाव तालुका - 6
भाजप : 3
शिवसेना : 2
शिवसेना UBT: 1
NCP : 0
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
(20 ov) 153/7
|
VS |
SA
154/5(17.5 ov)
|
| South Africa beat Zimbabwe by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 212/8
|
VS |
SL
207/6(20 ov)
|
| Pakistan beat Sri Lanka by 5 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.