Municipal Corporation Election In Maharashtra 2025: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. नगरपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुकांनंतर पालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.महायुतीनेही रणनिती आखण्यास सुरु केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा आणि विधानसभेनंतर महायुतीला आता महानगरपालिका जिंकून विजयाची हॅटट्रिक मारण्याची संधी आहे. छत्रपती संभाजीनगर हे आधीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला होता. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभा व विधानसभेत मोठा विजय मिळवला होता.
संभाजीनगर शहरात शिंदेसेनेचे दोन व भाजपचे दोन आमदार आहेत. तसंच, शिवसेना आणि भाजपने एकएक कॅबिनेट मंत्रीपद शहराला दिले आहेत. तसंच, दोन खासदारही आहेत. महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळं महायुतीचे पारडे जड आहे. तर, दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीतील अनेक शिलेदार अगोदरच महायुतीतील कोणत्या ना कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे.
दरम्यान, एप्रिल 2020मध्येच छत्रपती संभाजीनगर महापालिकेची मुदत संपली होती व सभागृह विसर्जित करण्यात आलं होतं. तेव्हापासून या महापालिकेवर प्रशासक राज आहे. अस्तिककुमार पांडे हे पहिले प्रशासक होते. त्यानंतर डॉ. अभिजित चौधरी होते. तर आता जी. श्रीकांत यांच्याकडे अधिकार आहेत. तर, महापालिकेच्या 10 वर्षांच्या हद्दीत 3 लाख 98 हजार मतदार वाढले आहेत. त्यामुळं हे मतदार महापालिकेच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.
एकूण प्रभाग किती? 29
एकूण सदस्य संख्या? 115
113 जागांपैकी 58 महिलांसाठी, 31 ओबीसी, 22 एससी आणि 2 एसटीसाठी आरक्षित आहेत. त्यावरुन जागावाटपाचा वाद वाढू शकतो. गेल्या निवडणुकीत शिवसेना 29, एआयएमआय 25, भाजप 22 अशा जागा लढवल्या होत्या.तर या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची स्पर्धा असेल.
शिवसेना-28
भाजप-22
एमआयएम-25
काँग्रेस-11
राष्ट्रवादी काँग्रेस-04
बसप-03
अपक्ष-22
राज्यातील सर्व 29 महापालिका निवडणुका या 15 जानेवारीला होणार असून निवडणुकांचे निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहेत. राज्यातील 2869 जागांसाठी निवडणुक होणार आहे. 1442 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 27 नगरपालिकांची मुदत संपली होती. तर, जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन नगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.