Chhatrapati Sambhaji nagar crime news : छत्रपती संभाजीनगरमधील एक व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. एक पोलीस कर्मचारी 14 लाखांची लाच घेताना व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ व्हायर झाल्यावर पोलिस खात्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. या प्रकरणी संबधीत पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
संभाजीनगरच्या लेणी परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खनवर कारवाई करू नयेत यासाठी एका पोलीस निरिक्षकाने आपल्या रायटरच्या माध्यमातून लाच घेतल्याचा देखील दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती 14 लाख रुपये मोजून घेताना दिसत आहे, आणि हा व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाचेची रक्कम घेतली जात असल्याच्या दाव्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
तर, या सर्व घटनेवर पोलिसांची देखील प्रतिक्रिया आली आहे, व्हिडिओ दिसणाऱ्या पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आला आहे. तसेच ज्या पोलीस निरीक्षकावर आरोप करण्यात आले त्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, मंत्रालयात लाचखोरीचं मोठं प्रकरण उघडकीस आले. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला काल एसीबीने अटक केलीय..मंत्रालयाच्या दुस-या मजल्यावरील मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचत लिपिक राजेंद्र ढेरंगेला 35 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केलीय...
मेडिकल परवाना निलंबन रद्द करण्यासाठी त्याने एका नागरिकाकडे लाच मागितली होती.एसीबी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र ढेरंगे याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. पडताळणीत ढेरंगेने लाच मागितल्याचे स्पष्ट होताच मंगळवारी सायंकाळी 6 वाजता सापळा रचण्यात आला आहे. तडजोडीअंती ढेरंगे तक्रारदाराकडून ३५ हजार रुपये घेण्यास तयार झाला. अखेर, ३५ हजाराची लाच घेताना त्याला ताब्यात घेण्यात आले.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
PAK
(20 ov) 212/8
|
VS |
SL
207/6(20 ov)
|
| Pakistan beat Sri Lanka by 5 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
(20 ov) 159/7
|
VS |
ENG
161/6(19.3 ov)
|
| England beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 256/4
|
VS |
ZIM
184/6(20 ov)
|
| India beat Zimbabwe by 72 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.