close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ICC RANKING: स्टीव स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आल्याने विराटची रँकिंग धोक्यात

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव स्मिथ  (Steven Smith) आईसीसीच्या (ICC)  टेस्ट रॅकिंग (ICC Test Ranking) मध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

Updated: Aug 19, 2019, 06:15 PM IST
ICC RANKING: स्टीव स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आल्याने विराटची रँकिंग धोक्यात
दुबई : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव स्मिथ  (Steven Smith) आईसीसीच्या (ICC)  टेस्ट रॅकिंग (ICC Test Ranking) मध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्मिथने एशेज सीरीजच्या पहिल्या टेस्टच्या दोन्ही डावांमध्ये शतक केले, आणि दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात त्याने ९२ धावा बनवल्या. दुखापतीमुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकला नाही. एशेजमध्ये त्याच्या तीन डावांमध्ये आतापर्यंत ३७८ रन केले आहेत. या प्रदर्शनासोबत स्टीव स्मिथ याने भारताचा कर्णधार विराट कोहलीला आव्हान दिले आहे.
 
स्मिथचा टीम मित्र ट्रेविस हेड १८ व्या आणि मार्नल लाबुशेन १६ व्या नंबर वर पोहचले. तरी डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा आणि कॅमरून बेनक्राफ्ट यांना क्रमश : चार, पाच आणि पाच क्रमांकाने खाली आले आहेत. परंतू स्मिथने एशेजच्या सुरवातीला दोन टेस्टमध्ये उत्कृष्ठ प्रदर्शन करत विराट कोहलीला संदेश दिला की, लवकरच त्याची जागा घेण्यासाठी तो तयार आहे. 
 
एक वर्ष क्रिकेट पासून लांब असूनही स्मिथ आता भारताचा कर्णधार विराट कोहलीहून फक्त नऊ रन्सने मागे आहे. स्मिथचे एकूण रन ९१३ झाले आहेत आणि कोहली ९२२ रनांनी प्रथम क्रमांकावर कायम, तर चेतेश्वर पुजारा नंबर चारवर कायम आहे. 
 
जर विराट कोहलीला त्याची जागा सांभाळून ठेवायची असेल तर त्याला विंडीजच्या विरोधात सुरू होणाऱ्या दोन टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये स्टीव स्मिथसारखे रन करण्याची आवश्यकता आहे. त्याबरोबरच, न्यूझीलंडच्या विरोधात पहिल्या टेस्ट मॅचमध्ये १ हजार २३२ रनांचा डाव खेळून आपल्या टीमला विजय मिळून देणारा श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करूणारत्ने आठव्या स्थानावर आहे. करूणरत्ने सात वर्षाच्या टेस्ट करिअरमध्ये पहिल्यांद्या टॉप-१० मध्ये पोहचला.
 
गोलंदाजच्या यादीत टेस्टमध्ये पदार्पण करणारा इंग्लंडचा फास्ट गोलंदाज जोफरा आर्चर ८३ व्या क्रमांकावर पोहचला.