Kajol Devgan : बॉलिवूड इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री काजोल सध्या तिच्या बहुप्रतिक्षित हॉरर चित्रपटामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव 'मां' आहे. अशातच अभिनेत्रीने एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये काजोलने सांगितले की तिने एका मोठ्या चित्रपटाची ऑफर नाकारली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत काजोलने खुलासा केली की, तिने आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांचा '3 इडियट्स' चित्रपटाची ऑफर नाकारली होती. परंतु, काजोलला चित्रपट नाकारल्याचा कसलाही पश्चात्ताप झाला नाही.
पुढे ती म्हणाली की, तिला जर एखाद्या चित्रपटाची कथा आवडली नसेल तर ती कोणताही जास्त विचार न करता चित्रपटाला नकार देते. त्यानंतर काजोल हसून म्हणाली की, माझ्यासोबत असे अनेकदा घडलं आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 16 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला '3 इडियट्स' चित्रपट. काजोलने 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' अशा हिट चित्रपटात काम केलं आहे. त्यामुळे तिला त्या चित्रपटाला नकार दिल्यामुळे काहीही वाटले नाही. ती म्हणाली की, जे चित्रपट ज्यांचे असतात ते त्यांनाच मिळतात. त्यामुळे मी विना चित्रपट देखील स्वता: साठी खूप चांगले काम केले आहे.
'3 इडियट्स' चित्रपटाला दिला होता नकार
काजोलची ही विचार करण्याची पद्धत ही तिला इतर कलाकारांपेक्षा वेगळं बनवते. 2009 मध्ये '3 इडियट्स' चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे. हा चित्रपट चेतन भगत यांच्या 'फाइव्ह पॉइंट समवन' या कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटात आमिर खान, आर. माधवन आणि शरमन जोशी यांनी भूमिका साकारल्या होत्या.
काजोलच्या जागी करीनाने साकारली होती भूमिका
या चित्रपटात करीना कपूरने पियाची भूमिका साकारली होती. ज्यामध्ये करीनाला कॉलेजच्या कडक दिग्दर्शकाची मुलगीची भूमिका केली होती. जर काजोलने ही भूमिका साकारली असती तर चित्रपटात काहीतरी वेगळे दिसले असते. परंतु, करीनाने ती मोठ्या मनाने साकारली. 55 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाने जगभरात 400 कोटींची कमाई केली.
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 135/9
|
VS |
GER
137/6(18 ov)
|
Germany beat Tanzania by 4 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(20 ov) 207/2
|
VS |
GER
161/8(20 ov)
|
Bahrain beat Germany by 46 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.