OTT Most Trending Horror Film: 2025 मध्ये प्रदर्शित झालेला हा हॉरर चित्रपट तुम्ही एकटे कधीच पूर्ण पाहू शकणार नाही. प्रदर्शित होताच नेटफ्लिक्सवर बनला नंबर 1.

OTT Most Trending Horror Film: 2025 हे वर्ष अॅक्शन, थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपटांनी गजबजलेलं होतं. पण 2025 मध्ये एक असा हॉरर फिल्म रिलीज झाला, जो एकट्याने पाहण्याची हिम्मत फारच कमी लोकांमध्ये होती. या चित्रपटाचे नाव ‘Until Dawn’ आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः हादरवून टाकलं आहे.
चित्रपटाची कथा आठ मित्रांच्या आजूबाजूला फिरते. जे एका मिस्टेरियस खोऱ्यात जातात. तिथे ते टाइम लूपमध्ये अडकतात आणि प्रत्येक रात्री त्यांच्यावर मृत्यूचा जीवघेणा सापळा येतो. तोही अनेकदा. प्रत्येक मृत्यू नवा भीतीदायक अनुभव घेऊन येतो.
हा चित्रपट 2015 मध्ये आलेल्या एका प्रसिद्ध व्हिडीओ गेमवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हॉरर मास्टर डेव्हिड एफ. सँडबर्ग यांनी केलं आहे. ज्यांनी याआधी Lights Out आणि Annabelle Creation सारख्या चित्रपटांमधून लोकांना घाबरवले आहे.
‘Until Dawn’ या चित्रपटात क्लोव्हरची भूमिका एला रुबिन हिने साकारली आहे. तर तिच्यासोबत मायकेल सिमिनो, ओडेसा अजिओन, जी-यंग यू, बेलमॉन्ट कैमेली आणि माया मिशेल यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे व्हिडीओ गेममधील डॉक्टर एलन जे. हिलची भूमिका पुन्हा पीटर स्टॉर्मेअर यांनीच केली आहे.
या चित्रपटाची स्क्रिप्ट गॅरी डॉबर्मन आणि ब्लेअर बटलर यांनी लिहिली आहे. चित्रपट R-रेटेड असून त्यात स्लॅशर, गोर, फाउंड फुटेज अशा हॉरर गोष्टींचा अनोखा संगम पाहायला मिळतो. हा चित्रपट प्रेक्षकांच्या शरिराचा थरकाप उडवणारा आहे.
‘Until Dawn’ या चित्रपटाचे बजेट सुमारे 480 कोटी रुपये होते. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच जवळपास 720 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर 24 जुलै रोजी हा चित्रपट Netflix वर प्रदर्शित करण्यात आला आणि अवघ्या 6 दिवसांमध्ये हा चित्रपट नेटफ्लिक्सवर नंबर 1 वर पोहोचला.
दरम्यान, या चित्रपटाला IMDb रेटिंग 10 पैकी 5.8 देण्यात आली आहे. Netflix टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे. अमेरिका आणि भारतात हा चित्रपट जास्त करून लोकप्रिय ठरला. चित्रपटातील प्रत्येक रात्रीचं नवं भय आणि सस्पेन्स हा या चित्रपटाची खास वैशिष्ट्यं आहेत. गेमप्रेमींना चित्रपट गेमपासून थोडा वेगळा वाटला पण सामान्य प्रेक्षकांनी याला प्रचंड पसंती मिळत आहे.