लवकरच येणार आनंदाची बातमी, डिलिव्हरीसाठी माहेरी पोहोचली 36 वर्षांची अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. लवकरच दोघेही पालक होणार आहेत. अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 18, 2025, 10:05 PM IST
 लवकरच येणार आनंदाची बातमी, डिलिव्हरीसाठी माहेरी पोहोचली 36 वर्षांची अभिनेत्री

Parineeti Chopra Mom to Be: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. सिनेसृष्टी आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत लोकप्रिय असलेल्या या जोडप्याच्या आयुष्यात आता एक नवीन पर्व सुरू होणार आहे. कारण परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा लवकरच आई-वडील होणार आहेत.

Add Zee News as a Preferred Source

या दोघांची जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. 2023 मध्ये उदयपूर येथे पारंपरिक पद्धतीने आणि धूमधडाक्यात त्यांनी लग्नगाठ बांधली होती. या लग्नाला काही निवडक नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. दोघांनी बराच काळ आपला रिलेशनशिपचा गोपनीयपणा जपला होता आणि नंतरच आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केली होती.

आता त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येणार आहे. ऑगस्ट 2025 मध्ये या जोडप्याने सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट शेअर करत परिणीती चोप्राच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. त्या पोस्टनंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

दरम्यान, अलीकडेच परिणीती चोप्रा दिल्ली विमानतळावर दिसली होती. तिच्यासोबत पती राघव चढ्ढा देखील उपस्थित होते. परिणीती चोप्रा सध्या दिल्लीमध्येच असल्याचं समजतं आणि यामागचं कारण म्हणजे तिचा प्रेग्नन्सी पीरियड आता जवळपास पूर्ण झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, कधीही आनंदाची बातमी समोर येऊ शकते.

राघव चड्ढा सध्या आपल्या पत्नीच्या सोबत अधिकाधिक वेळ घालवत असून दोघे मिळून या खास क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. परिणीतीच्या चाहत्यांनाही तिच्या बाळंतपणाबद्दल मोठी उत्सुकता आहे. दोघांच्या लग्नाला अवघे दोन वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आता त्यांच्या घरात पहिलं अपत्य जन्माला येणार असल्याने राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. चाहते सोशल मीडियावर या जोडप्याला शुभेच्छांचा वर्षाव करत म्हणत आहेत की '#BabyChopraChadha लवकर या'!

FAQ

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न कधी आणि कसे झाले?

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न २३ सप्टेंबर २०२३ रोजी उदयपुर, राजस्थान येथे पारंपरिक पद्धतीने आणि धूमधडाक्यात झाले. हे लग्न गोपनीय ठेवण्यात आले असून, केवळ जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. दोघांनी लग्नापूर्वी आपला रिलेशनशिपचा गोपनीयपणा जपला होता आणि लग्नानंतर अधिकृत घोषणा केली.

प्रेग्नन्सीची घोषणा कधी आणि कशी झाली?

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये सोशल मीडियावर एक संयुक्त पोस्ट शेअर करून प्रेग्नन्सीची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्यांनी "आमच्या घरात लवकरच एक नवीन सदस्य येणार आहे" असा मजेशीर संदेश दिला होता. या घोषणेनंतर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

सध्या परिणीती चोप्रा कुठे आहेत आणि का?

परिणीती चोप्रा सध्या दिल्लीत आहेत, जिथे त्यांचे पती राघव चड्ढा यांचे राजकीय कार्यालय आहे. नुकतेच दोघे दिल्ली विमानतळावर दिसले, ज्यामुळे त्यांच्या बाळंतपणाची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. प्रेग्नन्सी पीरियड जवळजवळ पूर्ण झाल्याने, ते दिल्लीत स्थायिक झाले आहेत आणि बाळाच्या जन्माची वाट पाहत आहेत.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More