बॉलिवूडचे 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धर्मेंद्र यांच्यावर सध्या व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. धर्मेंद्र यांच्या तब्येतीची बातमी समजताच संपूर्ण बॉलिवूडमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन धर्मेंद्र यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या भेटीनंतर दोन्ही अभिनेत्यांनी माध्यमांशी बोलताना धर्मेंद्र लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली. धर्मेंद्र यांच्या तब्येतीची बातमी ऐकताच चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 'गेट वेल सून धर्मेंद्रजी' या हॅशटॅगसह हजारो लोकांनी पोस्ट्स शेअर केल्या असून, त्यांच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना सुरू आहेत.
धर्मेंद्र यांच्या जीवनशैलीबद्दल बोलायचं झालं, तर ४५० कोटींहून अधिक संपत्तीचे मालक असूनही ते आपल्या मुंबईतील आलिशान बंगल्यात फारकाळ राहत नाहीत. त्याऐवजी ते खंडाळा येथील आपल्या फार्महाऊसवर जास्तीत जास्त वेळ घालवतात. खंडाळा हे मुंबई–पुणे महामार्गावरील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेलं एक निसर्गरम्य ठिकाण आहे. हिरव्यागार झाडांनी वेढलेलं, डोंगर-दऱ्यांनी सजलेलं हे ठिकाण धर्मेंद्र यांच्या मनाला फार जवळचं आहे. त्यांच्या फार्महाऊसमध्ये फळबागा, शेती आणि जनावरं असून, तेथे ते निसर्गाच्या सान्निध्यात आपला बराच वेळ घालवतात. धर्मेंद्र वारंवार आपल्या फार्महाऊसवरील आयुष्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. शेती करतानाचे, झाडांना पाणी घालतानाचे किंवा प्राण्यांसोबत वेळ घालवतानाचे त्यांचे फोटो नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
धर्मेंद्र यांना शहराच्या गोंगाटापासून आणि फिल्म इंडस्ट्रीच्या गडबडीतून दूर राहणं अधिक आवडतं. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की, 'निसर्गात राहिलं की मन शांत राहतं, आणि जीवनाचा खरा आनंद मिळतो.' फार्महाऊसवर ते पूर्णपणे साध्या जीवनशैलीत जगतात. साधं अन्न, साधं आयुष्य आणि आपल्या जवळच्या माणसांसोबत वेळ एवढंच त्यांचं सुख आहे. विशेष म्हणजे, धर्मेंद्र फार्महाऊसवर एकटे राहत नाहीत. त्यांच्या सोबत त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर देखील तिथे वास्तव्यास असतात. त्यांचं एकमेकांशी अतूट नातं आजही कायम असल्याचं धर्मेंद्र यांच्या मुलगा बॉबी देओलने एका मुलाखतीत सांगितलं आहे. बॉबीने सांगितलं होतं की 'वडिलांना शांतता आणि निसर्ग खूप प्रिय आहे. फार्महाऊसवर त्यांना ती शांतता मिळते, म्हणूनच ते तिथे राहणं पसंत करतात.'
धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत ‘शोले’, ‘यादों की बारात’, ‘ड्रीम गर्ल’, ‘सीता और गीता’, ‘धरम वीर’ यांसारख्या असंख्य हिट चित्रपटांत काम केलं आहे. त्यांच्या दमदार अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने ते बॉलिवूडमधील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले गेले. वयाच्या 89व्या वर्षीही धर्मेंद्र सक्रिय आहेत. काही काळापूर्वी ते ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकले होते. त्यांच्या या भूमिकेचंही प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. सध्या धर्मेंद्र यांच्या प्रकृतीसंबंधी बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असली, तरी डॉक्टरांनी त्यांच्या स्थिती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. चाहते आणि चित्रपटसृष्टीतील सहकर्मी सगळेच एकच प्रार्थना करत आहेत 'धर्मेंद्रजी, लवकर बरे व्हा आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत.'
FAQ
धर्मेंद्र यांना नेमकं काय झालं आहे?
धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
धर्मेंद्र यांचं फार्महाऊस कुठे आहे आणि ते तिथे का राहतात?
धर्मेंद्र यांचं फार्महाऊस खंडाळा येथे आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात शांत आयुष्य जगण्यासाठी ते फार्महाऊसवर राहणं पसंत करतात. त्यांना शेती, झाडं आणि साधं जीवन आवडतं.
धर्मेंद्र यांच्यासोबत फार्महाऊसवर कोण राहतात?
धर्मेंद्र फार्महाऊसवर एकटे राहत नाहीत. त्यांच्या सोबत त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर देखील राहतात. त्यांच्या मुलगा बॉबी देओलनेही एका मुलाखतीत हे स्पष्ट केलं आहे.
कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे. ...Read More
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.