चेहऱ्यावर सुरकुत्या, विस्कटलेले केस...बंगाल फाइल्स चित्रपटातील मराठमोळ्या अभिनेत्रीचा लूक पाहून व्हाल थक्क

The Bengal Files Film:  द बंगाल फाइल्स चित्रपटात झळकणाऱ्या मराठी अभिनेत्रीचा लूक पाहून तुम्ही थक्क व्हाल. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 17, 2025, 12:23 PM IST
चेहऱ्यावर सुरकुत्या, विस्कटलेले केस...बंगाल फाइल्स चित्रपटातील मराठमोळ्या अभिनेत्रीचा लूक पाहून व्हाल थक्क
56 Year Old Pallavi Joshi Become First Actress To Play 100 Year Old Lady Role in The Bengal Files Film

The Bengal Files Film:  चेहऱ्यावर सुरकुत्या, विस्कटलेले केस अन् डोळ्यात भीती हा लूक आहे आगामी द बंगाल फाइल्स चित्रपटातील अभिनेत्रीचा. वयाच्या 56 व्या वर्षीच ही अभिनेत्री 100 वर्षांच्या आजीबाईंची भूमिका साकारणारी पहिली अभिनेत्री बनणार आहे. ही अभिनेत्री मराठमोळी असून हिचे नाव ऐकून तुम्हालाही आश्चर्च वाटेल. 56 वर्षांची पल्लवी जोशी ही भूमिका साकारत आहे. 

100 वर्षांची महिला बनणार पल्लवी जोशी

पल्लवी जोशीचा एक फोटो सध्या व्हायरल होतोय. या फोटोत ती 100 वर्षांच्या महिला दिसत असून या महिलेचे नाव मां भारती असं आहे. या फोटोत पल्लवी जोशीचे हावभाव वाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल. या भूमिकेबद्दल बोलताना पल्लवी जोशीने म्हटलं आहे की, 100 वर्षांच्या महिलेची भूमिका साकारणे खूप कठिण होते. प्रोस्थेटिक मेकअपमुळं मी खूप भयावह दिसत होती. जे आम्हाला नको होते. मां भारती एक निरागस, प्रेमळ आणि सर्वांप्रती जिव्हाळा असणारी स्त्री आहे. 

पल्लवीने तिच्या या भूमिकेसाठी खास तिच्या आजीकडून प्रेरणा घेतली असल्याचे तिने म्हटलं आहे. अभिनेत्रीने म्हटलं आहे की, मी सहा महिन्यांपासून लूकवर काम करण्यास सुरुवात केले. त्वचा कोरडी दिसण्यासाठी स्किनकेअरदेखील सोडलं होतं. मां भारतीला डिमेंशिया आहे. त्यामुळं मी याची इतकी प्रॅक्टिस केली ही हे माझ्यासाठी सहज आणि सोप्पे झाले. मी माझ्या आजीची यासाठी प्रेरणा घेतली होती. तसंच, माझ्या टीमनेदेखील मला पूर्ण सहकार्य केले. 

द बंगाल फाइल्स चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. पल्लवी जोशी आणि अभिषेक अग्रवाल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. गंभीर विषयांवर चित्रपट बनवणारे विवेक अग्निहोत्री यांनी द काश्मीर फाइल्स आणि व्हॅक्सीन वॉरसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 

हे कलाकार साकारणार भूमिका

बंगालमधील त्रास आणि हिंदू नरसंहार या विषयावर द बंगाल फाइल्स हा सिनेमा आहे. या सिनेमात मिथून चक्रवर्ती यांच्यासोबत अनुपम खेर, गोविंद नामदेव, पुनीत इस्सर, बब्बू मान आणि पालोमी घोष हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडेच या सिनेमाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. यात कलाकारांनी जीव तोडून काम केल्याचे दिसतेय.