)
Anuradha Paudwal: बॉलिवूडच्या संगीतविश्वात अनेक अशा दिग्गज गायिका आहेत ज्यांनी आपल्या सुरेल आवाजाने कोट्यवधी प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं. त्यापैकीच एक नाव म्हणजे अनुराधा पौडवाल. एक अशी गायिका ज्यांनी कोणतेही औपचारिक शास्त्रीय प्रशिक्षण न घेता आपल्या मेहनतीने, कानाच्या श्रवणशक्तीने आणि समर्पणाने संगीतविश्वात एक अमिट ठसा उमटवला.
अनुराधा पौडवाल यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1954 रोजी कर्नाटकातील कारवार जिल्ह्यात झाला. मात्र त्यांचं बालपण मुंबईत गेलं. त्यांचं खरं नाव अलका नाडकर्णी असं होतं. पण लग्नानंतर त्यांनी आपलं नाव बदलून अनुराधा पौडवाल असं ठेवलं. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. पण त्यांना शास्त्रीय संगीताचं कोणतंही औपचारिक प्रशिक्षण घेता आलं नाही.
लता मंगेशकर यांच्या गाण्यांनीच त्यांना संगीताची दिशा दिली. त्या लता मंगेशकर यांची गाणी ऐकून सराव करत असत. हळूहळू त्यांच्या आवाजातही तीच गोडी, गहिराई आणि माधुर्य निर्माण झालं. ज्यामुळे लोक त्यांच्या आवाजावर फिदा झाले.
अनुराधा पौडवाल यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘अभिमान’ या चित्रपटातून केली. या चित्रपटात त्यांनी जया भादुरींसाठी श्लोक गायला होता. छोटं गाणं असलं तरी तेच त्यांचं बॉलिवूडमधलं पहिलं पाऊल ठरलं.
यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. ‘जानेमन’, ‘उधार का सिंदूर’, ‘लैला मजनू’, ‘सरगम’, ‘एक ही रिश्ता’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दिलेल्या गाण्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली.
1990 च्या दशकात अनुराधा पौडवाल यांनी त्यांच्या आवाजाने बॉलिवूड अक्षरशः गाजवलं. ‘आशिकी’, ‘दिल है कि मानता नहीं’, आणि ‘बेटा’ या चित्रपटांसाठी त्यांनी दिलेले गाणे सुपरहिट ठरले. या चित्रपटांसाठी त्यांना सलग तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. जे कोणत्याही गायिकेसाठी मोठं यश होतं. त्यांनी सिद्ध केलं की, शास्त्रीय प्रशिक्षण नसतानाही मेहनत, श्रवणाभ्यास आणि आवड यांच्या जोरावर कोणताही कलाकार शिखर गाठू शकतो.
यानंतर त्यांच्या आवाजातील देवी-देवतांच्या भजनांनी लोकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. त्यांचं पहिलं देवी भजन 'आऊंगी आऊंगी मैं अगले बरस आऊंगी' इतकं लोकप्रिय झालं की, एकाच दिवसात त्या गाण्याच्या 90 हजार कॅसेट्स विकल्या गेल्या!.
FAQ
अनुराधा पौडवाल यांचा जन्म कधी आणि कुठे झाला आणि त्यांचं खरं नाव काय?
अनुराधा पौडवाल यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील कारवार जिल्ह्यात झाला. त्यांचं बालपण मुंबईत गेलं. त्यांचं खरं नाव अलका नाडकर्णी असं होतं, पण लग्नानंतर त्यांनी नाव बदलून अनुराधा पौडवाल ठेवलं.
अनुराधा पौडवाल यांना शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण कसं मिळालं?
अनुराधा पौडवाल यांना कोणतंही औपचारिक शास्त्रीय संगीत प्रशिक्षण मिळालं नाही. लहानपणापासून संगीताची आवड असली तरी त्यांनी लता मंगेशकर यांच्या गाण्यांमधून श्रवणाभ्यास करून सराव केला. यामुळे त्यांच्या आवाजात गहिराई आणि माधुर्य निर्माण झालं.
अनुराधा पौडवाल यांचं बॉलिवूडमधलं पदार्पण कसं झालं?
अनुराधा पौडवाल यांनी ‘अभिमान’ या चित्रपटातून पदार्पण केलं, ज्यात जया भादुरींसाठी श्लोक गायला होता. हे छोटं गाणं असलं तरी त्यांचं बॉलिवूडमधलं पहिलं पाऊल ठरलं. यानंतर ‘जानेमन’, ‘उधार का सिंदूर’, ‘लैला मजनू’, ‘सरगम’, ‘एक ही रिश्ता’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी हिट गाणी दिली.