मुलगी आयरा खान वडिल आमिर खानच्या घटस्फोटानंतर चर्चेत आली होती.
मुंबई : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणारा अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने सांगितलं आहे की, ती जेव्हा लहान होती तेव्हा तिची आई रीना दत्ताने तिला सेक्स एज्युकेशनचं एक पुस्तक गिफ्ट केलं होतं. अगस्तु फाउंडेशनसाठी 'पिंकी प्रॉमिस टू मी' या सीरीजच्या एका भागामध्ये आयरा जिज्ञासा या विषयावर बोलली होती.
आईने लैंगिक शिक्षणाचं पुस्तक भेट म्हणून दिलं
तिच्या इंस्टा स्टोरीमध्ये आयराने लिहिलं आहे की, 'मला नाही वाटत की, मी याआधी पहिलं कधी एवढं काळजीपूर्वक त्याला पाहिलं असेन. मी लहान होते. तेव्हा माझ्या आईने मला सेक्स एज्यूकेशनचंचे पुस्तक दिलं होतं. आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं की, मला आरशात स्वत:ला वरपासून खालपर्यंत पहावं लागेल. माझं शरीर खूप बदललेलं होतं आणि तरीही अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
आयरा वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत राहिली आहे
मुलगी आयरा खान वडिल आमिर खानच्या घटस्फोटानंतर चर्चेत आली होती. याशिवाय ती स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. आयरा बर्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होती आणि तिचा बॉयफ्रेंड हिंदू आहे, ज्यामुळे तिला सोशल मीडियावरही नेहमी ट्रोल केलं जातं.