Aamir Khan Dangal : 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दंगल' हा चित्रपट अभिनेता आमिर खानचा सगळ्यात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आणि अनेक रेकॉर्ड त्याच्या नावी केले होते. आमिर खाननं एका मुलाखतीत त्याच्या सगळ्यात चांगल्या चित्रपटांमध्ये एक दंगल असल्याचं म्हटलं होतं. त्यानं सांगितलं होतं की दंगलमध्ये त्यानं एक चूक केली होती जी फक्त अमिताभ बच्चन यांनीच नोटीस केली.
आमिर खानमं सांगितलं की एका सीनमध्ये तो त्याच्या भूमिकेतून बाहेर आला होता. ही गोष्ट फक्त अमिताभ बच्चन यांच्या सगळ्यात आधी लक्षात आली. रेड लॉरी फिल्म फेस्टिवलमध्ये मंसूर खानशी बोलताना आमिर खानला एका चाहत्यानं विचारलं की 'त्याच्या प्रमाणे त्यानं आजवर सगळ्यात चांगला परफॉर्मन्स कोणत्या चित्रपटात केला आहे.' आमिर खाननं या प्रश्नावर उत्तर देत 'दंगल' या चित्रपटाचं नाव घेतलं. त्यानं म्हटलं की 'मला वाटतं की दंगल. चित्रपटात फक्त ऐेक शॉट आहे जिथे मी चुकी केली. मिस्टर बच्चन, यांच्या फक्त ती लक्षात आली. त्यांनी हा शॉट पकडला.'
आमिरनं त्याची चूक सांगितली की अमिताभ बच्चननं त्याला सांगितलं की एका शॉटमध्ये तो भूमिकेतून बाहेर आला होता. आमिरनं सांगितलं की अमिताभ बच्चनला सांगितलं की 'एका शॉटमध्ये तू तुझ्या भूमिकेतून बाहेर आला होतास. आमिरनं जेव्हा विचारलं की कोणता शॉट तर त्यांनी सांगितलं की कुस्तीच्या एका शॉटमध्ये जिथे तो जेव्हा उभा राहतो तर त्यावर तो येस म्हणाला.' आमिर म्हणाला की 'त्याची जी भूमिका होती ती येस बोलू शकत नव्हती. त्या भूमिकेनं वाह किंवा शाब्बास सारखं काही बोलायला हवं होतं. येस खूप इंग्लिश असल्याचं जाणवतं. मुंबईसारखं. तो एकच शॉट एडिटमध्ये राहिला आणि मला पण त्याविषयी नंतर जाणवलं.'
दरम्यान, आमिर खानच्या दंगल या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर हा सगळ्यात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.