Aamir Khan's Daughter Ira Khan : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. आता त्याचं चर्चेत येण्याचं कारण त्याची आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ताची लेक इरा खान आहे. काल 17 मार्च रोजी इरा ही वडील आमिर खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली होती. त्याला भेटल्यानंतर ती जेव्हा घरातून बाहेर आली तेव्हा पापाराझींनी तिला रडताना स्पॉट केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरलभयानीनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत आमिर खान आणि त्याची लेक गाडीत बसण्या आधी एकमेकांना भेटताना दिसतात. त्यावेळी ते कोणत्या तरी गोष्टीविषय बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर गाडीत बसताना इराला तिचे अश्रू अनावर झाले आणि ती रडू लागली. पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
इराही मानसिक आरोग्य वकील आहे. ती QPR आणि SPIF द्वारं प्रमाणित आत्महत्या प्रतिबंधक आहे. इन्स्टाग्राम पोस्टद्वारे, इरा तिच्या चाहत्यांना नेहमीच आत्महत्या करू नका याविषयी सांगताना दिसते. इरा नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीनं तिच्या फॉलोवर्सना या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करताना दिसते. इरानं सगळ्यात आधी सगळ्यांमध्ये मानसिक आरोग्यासंबंधीत अडचणींमविषयी मोकळेपणानं सांगितलं. या विषयावर ती मोकळेपणानं चर्चा करताना दिसली. काही चाहत्यांनी यासाठी काही कॅम्प किंवा मग सेशन घेण्यास सांगितले. दरम्यान, इरा ही थोडक्यात मानसिक आरोग्यावर काम करत असल्याचे पाहायला मिळते.
हेही वाचा : सनी लियोनीचा डायहार्ड फॅन होता ओसामा बिन लादेन, ठार मारल्यानंतर काय-काय सापडलं?
आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या त्यानं त्याच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली. आमिरच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झाल तर पहिलं लग्न ही रीना दत्तशी झालं होतं. आमिर आणि रीना यांना दोन मुलं आहेत. जुनैद आणि इरा खान. जुनैदनं नेटफ्लिक्सवरील महाराज या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर त्यानंतर तो लवयापा या चित्रपटात दिसला. थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा त्याचा पहिला चित्रपट आहे. इरानं गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात 2024 मध्ये बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी लग्न केलं.