Aamir Khan : सध्या सोशल मीडियावर आमिर खानचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यात तो गुरुनानक यांच्या लूकमध्ये दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे की आमिर खाननं तिच्या अपकमिंग प्रोजेक्ट गुरुनानक यांच्यावर आहे. आता या पोस्टचं सत्य समोर आलं आहे. आमिरच्या टीमनं या व्हायरल होणाऱ्या पोस्टरवर स्पष्टीकरण दिलं आहे. आमिर खानचे स्पोक्सपर्सननं या पोस्टचं सत्य सांगितलं आहे आणि सांगितलं की आमिरला गुरुनानक यांच्या रुपात दाखवण्यात आलेलं हे पोस्टर फेक आहे आणि जे AI नं बनवलं आहे.
पोस्टरमध्ये आमिरला 'गुरु नानक' यांच्या लूकमध्ये दाखवण्यात आलं आहे आणि त्यासोबतच हे देखील सांगण्यात आलं आहे की लवकरच ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. आता आमिरच्या स्पोक्सपर्सननं आमिरच्या चाहत्यांना या सगळ्या अफवांपासून सावधान राहण्यास सांगितले आहे. त्यानं सांगितलं की 'आमिर खानला गुरु नानकच्या रुपात दाखवण्यात आलेलं पोस्टर हे पूर्णपणे खोटं आहे आणि इतकंच नाही तर AI च्या मदतीन हे पोस्टर बनवण्यात आलं आहे. आमिर खानला अशा कोणत्याही चित्रपटासाठी काही संबंध नाही आहे. तर गुरुनानक यांचा तो खूप सन्मान करतो आणि कधीच काही अपमान होईल असं काही करणार नाही. त्यामुळे कृपया खोट्या बातम्या पसरवू नका.'
दरम्यान, आमिरचं पोस्टर किंवा त्याच्या संबंधीत कोणती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. तर या आधी देखील अर्थात लोकसभा निवडणूकीच्या आधी आमिरचा एक फेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तो घोषणांपासून दूर राहण्याबद्दल बोलत होता.
आमिरच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्याचा पुढचा चित्रपट 'सितारे जमीन पर' आहे. हा चित्रपट 20 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मानसिक आरोग्यावर चर्चा करण्यात येईल. हा चित्रपट निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. आमिर सगळ्यात शेवटी चार वर्षांपूर्वी अर्थात 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला, त्यानंतर नाराज झालेल्या आमिरनं स्वतःला चित्रपटांपासून दूर केले.